मुंबई : बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी लागला आहे. हा निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाहता आला. आता विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा दहावीच्या निकालाकडे आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
2 ते 25 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. News18Lokmat च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यावर एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.
10वीनंतर थेट NDA ची तयारी करायची आहे? मग तुमच्यासाठी 'हे' मिलटरी कॉलेज आहे परफेक्ट; बघा पात्रता
SSC चा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर, आईचं नाव आणि तिथे दिलेली बेरीज किंवा वजाबाकी करुन आकडे लिहायचे आहेत. पुढे क्लिक केल्यानंतर निकाल ऑनलाईन दिसेल. तुम्ही निकालाची प्रत घेऊ शकता किंवा PDF सेव्ह करू शकता.
निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
SMS वर कसा करायचा निकाल चेक?
तुमच्या मोबाईल फोनवर मेसेजिंग अॅप उघडा.
एक नवीन संदेश तयार करा.
प्रकार: MHSSC [स्पेस] रोल नंबर
57766 वर मेसेज पाठवा.
काही सेकंद थांबा.
तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर तुमच्या महाराष्ट्र SSC निकाल 2023 सह एसएमएस येईल
अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन
यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ या लिंकवर जा.
यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा.
यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल.
इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा.
यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर.
यानंतर Register या बटनेवर क्लिक करा.
अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला निकालासंदर्भात लिंक येईल.
यानंतर तुम्हाला निकाल जाहीर झाल्या झाल्या लिंक ओपन करून निकाल बघता येईल.
निकाल बघून तुमचा निकाल सेव्हही करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Maharashtra Board Exam, Maharashtra News, SSC Result