SSC Board Exam : गणित विषयात 15 दिवसांत अभ्यास करून कसे मिळवाल चांगले गुण?

SSC Board Exam : गणित विषयात 15 दिवसांत अभ्यास करून कसे मिळवाल चांगले गुण?

गणिताचा पेपर म्हटलं की पोटात गोळा येतो. ही मनातील भीती बाजूला ठेवून या गोष्टींचा अवलंब केला तर नक्की चांगले मार्क मिळतील.

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी: दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरु होत आहे. या विषयांमध्ये सर्वात पहिल्या दिवसापासून पोटात गोळा आणणारा विषय आहे गणित. गणिताचा पेपर म्हणजे डोक्यावर भलमोठं टेन्शन असतं मात्र शेवटच्या 20 दिवसांमध्ये आपण अभ्यास करताना काही खास ट्रिक्स आणि टिप्सचा वापर केला तर आपल्याला अवघड वाटणारा विषयही अगदी चांगले मार्क मिळवून देणारा होईल त्यामुळे टेन्शन न घेता अभ्यासाला सुरुवात करायला हवी.

भीती घालवा- मला जमणार नाही किंवा मी चुकेन अशी भीती मनातून घालवून टाका. गणिताची भीती किंवा विसरणार नाही याची काळजी घ्या.

बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा- आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लीअर करा. त्यासाठी आधीच्या वर्षातील पुस्तकं रेफर करा. कन्सेप्ट क्लीअर नसेल तर आपल्याला प्रश्नच समजण्यात अडथळे येतील.

गणिताची प्रक्रिया फॉलो करा- गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक फॉर्म्युला आणि स्टेपला महत्त्व असतं. त्यामुळे त्या गाळू नका. प्रत्येक वर्षातील गणिताचे धडे महत्त्वाचे असतात, ते एकमेकांसोबत लिंक केलेलं असतं.

फॉर्म्युल्याची वेगळी वही करा, जी पेपरआधी फक्त आपल्याला वेगळी रेफर करता येईल. हे फॉर्म्युले लिहून सराव करा.

आधीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. त्यामुळे आपल्याला प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जातो याचा अंदाज येईल. घोकंपट्टी नाही तर डोक्यानं सोडवा. त्यातून कोणत्या धड्यातील प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येईल, ते धड्यांचा सराव जास्त करा. कोणताही प्रश्न सोडू नका पण आधी येणारा प्रश्न पहिला सोडवा, त्यानंतर न येणाऱ्या किंवा अवघड प्रश्नांकडे वळा म्हणजे आपल्याला वेळ पुरेल.

हेही वाचा-Board Exam 2020: फिजिक्सच्या पेपरमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स

हेही वाचा-Board Exam 2020 : परीक्षेआधी येणारा ताण 5 सोप्या टिप्सने करा दूर

First published: February 9, 2020, 10:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading