नवी दिल्ली, 18 जुलै: कर्मचारी निवड आयोग महाभरती 2021 (SSC CGL Recruitment 2021)अंतर्गत लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (Constable) पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 25,271 जागांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
कॉन्स्टेबल (Constable) - एकूण जागा - 25,271
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
हे वाचा - E-Ticket बुकिंगसाठी IRCTC एजेंट होण्याची संधी, महिन्याला होईल 80000 कमाई
शुल्क
या पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100/-रुपये शुल्क असणार आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Job alert, Jobs