मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SSC CGL परीक्षेसाठी लवकरच जारी होणार Official Notification; इतकी असेल वयोमर्यादा आणि फी

SSC CGL परीक्षेसाठी लवकरच जारी होणार Official Notification; इतकी असेल वयोमर्यादा आणि फी

लवकरच जारी होणार Official Notification

लवकरच जारी होणार Official Notification

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 सप्टेंबर: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून SSC CGL परीक्षेसाठीचं नोटोफिकेशन (SSC CGL 2022-23 Notification) काही दिवसांमध्ये जारी करण्यात येणार आहे. हे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर प्रसिद्ध केलं जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाही तातडीने सुरू होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

SSC CGL 2022 संगणक आधारित चाचणी (टियर I) परीक्षा दिनदर्शिकेनुसार डिसेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. त्याच वेळी, टियर II परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल. SSC भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्था आणि विविध संवैधानिक संस्था/न्यायालय इत्यादींमध्ये गट 'ब' आणि गट 'क' पदे भरण्यासाठी एकत्रित पदवी स्तर परीक्षा 2022 आयोजित करणार आहे.

SBI Clerk 2022: पहिल्याच प्रयत्नात क्रॅक होईल परीक्षा; आतापासूनच असा करा अभ्यास

रजिस्ट्रेशनसाठी हे डॉक्युमेंट्स IMP

इयत्ता 10, 12 गुणपत्रिका

मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र

श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

उमेदवाराच्या स्वाक्षरीची प्रतिमा

आधार किंवा इतर कोणताही वैध फोटो आयडी

अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन

उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे – ssc.nic.in.

मुख्यपृष्ठावर, सूचना लिंकवर क्लिक करा

सर्व तपशील देऊन स्वतःची नोंदणी करा आणि नंतर अर्ज भरण्यास सुरुवात करा.

कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.

सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी SSC CGL भर्ती 2022-23 फॉर्मची प्रिंट घ्या.

ग्रॅज्युएशन झालेल्यांना तब्बल 1 लाख रुपये पगाराची सरकारी नोकरी; इथे करा Apply

इतकं असेल अर्ज शुल्क

उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये भरावे लागतील. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 100 रु. SC, ST, PwD अंतर्गत अर्ज करणाऱ्या आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Jobs Exams