HSC Board Exam : पहिल्या पेपरला उरले अवघे काही तास... परीक्षेला जाण्यापूर्वी 6 गोष्टी लक्षात घ्या

पेपरला एकच दिवस म्हणजे फक्त 24 तास शिल्लक आहेत अशावेळी कसा अभ्यास करायचा

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी: दहावी आणि बारावीच्या निकालावरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल निश्‍चित होते. ही परीक्षा जितकी महत्त्वपूर्ण आहे तितकीच तणावपूर्ण. वर्षभर अभ्यास केला नसेल तर पास कसं व्हावं याचं टेन्शन असतं तर वर्षभर अभ्यास करूनही आपल्याला टॉप रँकिंग मिळवता येणार का याचं काही विद्यार्थ्यांना टेन्शन असतं. पेपरला एकच दिवस म्हणजे फक्त 24 तास शिल्लक आहेत अशावेळी कसा अभ्यास करायचा याबद्दल आज आम्ही थोडी आपल्याला मदत करणार आहोत.

1. महत्त्वाचे धडे आणि प्रश्न शांतपणे वाचा, सर्व पुस्तक वाचणं शक्य नसतं अशावेळी आपण काढलेल्या रनिंग नोट्सचा वापर करा. आपण रनिंग नोट्स काढल्या नसतील तर धड्याची समरी वाचा.

2. शक्य असेल तर एक तास मित्रांसोबत चर्चा करून पेपर सोडवा. असलेल्या पेपरची तयारी करण्याबद्दल चर्चा किंवा विचार करावा. त्याचं नियोजन तयार करावं.

3. आवश्यक ती झोप आणि आहार घ्यावा. अति जागरण करू नये त्यामुळे पेपरला झोप येण्याची शक्यता असते. मेंदू फ्रेश राहिला तर आपण चांगला पेपर सोडवू शकतो.  1 तासानंतर किमान 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा.

4. शक्यतो नवीन धडा किंवा उत्तर जे आधी कधीच वाचले नाही ते परीक्षेच्या एक दिवस आधी वाचणे टाळावे त्याचा आपल्या इतर अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.

5. नकारात्मक विचार करणं टाळा. एखादा छंद, किंवा शांत म्युझिक ऐका किंवा ताण घालवण्यासाठी आपलं मन रमवा. टीव्ही किंवा मोबाईलपासून शक्यतो परीक्षा संपेपर्यंत लांब राहाणं केव्हाही उत्तम. त्यामुळे आपलं मन विचलीत होऊ शकतं.

6. संपूर्ण धडा अथवा प्रश्न लक्षात राहात नसतील तर पाय डायग्राम, चार्ज रनिंग नोट्सचा वापर करून किंवा कोडवर्डचा वापर करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा-Board Exam : परीक्षेचं टेन्शन दूर करायचं असेल तर एकदा हे VIDEO पाहाच

हेही वाचा-Board Exam : परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?

हेही वाचा-Board Exam : पहाटे 4 वाजता उठून अभ्यास केल्यानं होतो मोठा फायदा, जाणून घ्या...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2020 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading