Board Exam : पहाटे 4 वाजता उठून अभ्यास केल्यानं होतो मोठा फायदा, जाणून घ्या...

Board Exam : पहाटे 4 वाजता उठून अभ्यास केल्यानं होतो मोठा फायदा, जाणून घ्या...

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. यावेळी आता आळस करून चालणार नाही. त्यामुळे वर्षभर अभ्यास केला नसेल तरीही आता आळस करून चालणार नाही. आहे त्यावेळा चांगला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मग प्रश्न असा उरतो की अभ्यास सकाळच्या वेळी लवकर उठून करावा की रात्री जागून. अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करण्याची सवय असते. मात्र हे आपल्याला माहीत आहे का? पहाटे लवकर उठून केलेला अभ्यास हा सकाळी किंवा रात्री जागून केलेल्या अभ्यासापेक्षा जास्त चांगल्यापद्धतीनं लक्षात राहातो. पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याचे नेमके काय आहेत फायदे जाणून घ्या सविस्तर.

सकाळी आपला मेंदू जास्त ऊर्जेने काम करतो. त्यामुळे एकदा किंवा दोनदा वाचलेल्या गोष्टी पटकन लक्षात राहतात. सकाळी फार मेंदुला ताण द्यावा लागत नाही. पहिले दोन दिवस उठायची सवय नसेल तर त्रास होईल मात्र एकदा शरीराला सवय झाली की त्रास होणार नाही यासाठी आतापासून सवय करा.

सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला वेळ जास्त मिळतो. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रभावित होते. त्यामुळे 10 वाजता झोपा, झोपण्याआधी दुसऱ्या दिवशीचं नियोजन पक्क करा.

सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा 10 मिनिटं चाला त्यानंतर स्वच्छ आवरून मग अभ्यासाला बसा. झोपाळलेल्या अवस्थेत अभ्यासाला बसण्यापेक्षा आवरुन छान फ्रेश बसा. सकाळी ऊँकार केल्यास मेंदूला चांगली ऊर्जा मिळते.

हेही वाचा-HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका

सकाळच्या वेळेत आपला मेंदू हायअॅक्टीव मोडवर असल्यानं अवघड विषयांचं अध्ययन सकाळच्या वेळेत करा. त्यामुळे आपल्याला फायदा अधिक होईल.

रात्रीच्या वेळी उशिरा जागून उशिरा उठल्यानं वेळ वाया जातो याशिवाय आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा परिणाम शरीरावर मनावर आणि अभ्यासावरही होत असतो.

त्यामुळे काही दिवसच उरले आहेत. अशा स्थितीत पहाटेच्या वेळी लवकर उठून चांगला अभ्यास केला तर आपण नक्की यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा-Board Exam : गणित विषयात 15 दिवसांत अभ्यास करून कसे मिळवाल चांगले गुण?

हेही वाचा-SSC BOARD EXAM: 15 दिवसांत अभ्यास करून मिळवा 90 टक्के मार्क

First published: February 12, 2020, 11:06 PM IST

ताज्या बातम्या