परीक्षा दहावीची उरले फक्त 4 दिवस, अशी करा शेवटची उजळणी

परीक्षा दहावीची उरले फक्त 4 दिवस, अशी करा शेवटची उजळणी

दहावीच्या परीक्षेला शेवटचे 4 दिवस शिल्लक आहेत. आपण वर्षभर अभ्यास केलेला असूदे किंवा नसूदे अखेरच्या टप्प्यातला अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असतो.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : दहावीच्या परीक्षेला शेवटचे 4 दिवस शिल्लक आहेत. आपण वर्षभर अभ्यास केलेला असूदे किंवा नसूदे अखेरच्या टप्प्यातला अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशावेळी फार खोलात न जाता आता आपल्याला कमी वेळा सगळं कव्हर करायचं असतं. शेवटच्या टप्प्यात सगळं वाचत बसणं शक्य नसतं अशावेळी आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिका संदर्भ घटना आणि इतर गोष्टीही लक्षात ठेवायच्या असतात. मग गोंधळ टाळण्यासाठी काही टेक्निक्सचा वापर केला तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो.

1. आपण वाचत असताना महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाच्या गोष्टी हायलाईटरनं किंवा वेगळ्या रंगाच्या पेनानं रेषा आखा किंवा ठळक करा. त्यामुळे पेपर आधी आपल्याला सुट्टी असेल तर आपण ठळक मुद्दे वाचू शकता. आणि ठळक केलेले मुद्दे अधिक चांगले लक्षात राहतात.

2. प्लो चार्ट, किंवा ट्री किंवा मुद्दे वेगवेगळे तक्ते आखून तयार करा. म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपे जातात. आणि शेवटच्या काही तासांत नजरेखालून मुद्दे घालणं सहज शक्य होतं.

हेही वाचा-SSC Board Exam : परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी करू नका या चुका

3.मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि धडा आणि त्यासाठी असणारे मार्क यावर थोडा वेळ देऊन काम करा. म्हणजे कोणत्या धड्यातील प्रश्न कसे आणि किती मार्कांसाठी असतील याचा अंदाज येईल.

4. पासिंगचा विचार करत असाल तर मोठे प्रश्न सोडवण्याऐवजी पर्यायी उपप्रश्न सोडवा उदा. 15 किंवा 10 मार्कांच्या प्रश्नाला 05 मार्कांचे 4 पर्यायी प्रश्न असतील तर ते सोडवले तर जवळपास 4 मार्क मिळण्यास मदत होते. 10 मार्कांमध्ये 10 पैकी 8 मार्क मिळणंही फार कठीण होतं काहीवेळा.

5. जागरण टाळा, योग्य आहार घ्या, ताण घेऊ नका आणि आधीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांवर विचार न करता त्या पुन्हा होणार नाहीत याकडे गांभीर्यानं लक्ष द्या.

हेही वाचा-SSC Board Exam 2020 : 'या' 7 सोप्या टिप्सने मिळवू शकता हिंदी विषयात चांगले गुण

First published: February 26, 2020, 5:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या