अपंगत्वावर मात करून नृत्यकलेवर प्रभुत्व मिळवेल्या प्रेरणाची कहाणी

अपंगत्वावर मात करून नृत्यकलेवर प्रभुत्व मिळवेल्या प्रेरणाची कहाणी

12 वर्षांच्या प्रयत्नातून कर्णबधिर मुलगी ताल आणि सुरावर उत्तम भरतनाट्यम् करू शकते हे प्रेरणानं सिद्ध केलं.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै: एका छोट्याश्या अपयशानं खचून जाणारे अनेक तरुण-तरुणी आत्महत्या करण्याचा किंवा टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतात पण आयुष्यात सर्वात मोठं संकट जन्मानंतर काहीच दिवसात कोसळलेल्या या मुलीनं मोठ्या हिमतीनं स्वत:ला सिद्ध करत तरुणांना प्रेरणा दिली आहे. अशा प्रेरणादायी प्रियांकाची संघर्षमय कहाणी आणि तिचा प्रवास जाणून घेणार आहोत.

प्रेरणा सहाणे (प्रियांका) ला जन्मानंतर काही महिन्यांतच एका मोठ्या आजारानं ग्रासलं. त्या आजारात तिने आपली श्रवणशक्ती गमावली आणि त्यातच अपंगत्वही आलं. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. 6 महिन्यांची असताना तिला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे तिच्या पायातली ताकद गेली आणि ऐकू येणंही पूर्णपणे बंद झालं. लहानपणापासून ऐकू येत नसल्यानं बोलताही येत नव्हतं. अशा परिस्थितीवरही तिनं हार न मानता आपल्यातलं वेगळेपण ओळखलं.

प्रेरणाच्या आईनं तिला शास्रीय नृत्याचा क्लासला घातलं. सुरुवातील तिच्या गुरू शमिता महाजन यांनाही तिला कसं शिकवायचा प्रश्न पडला. मात्र न येणाऱ्या अवघड रचना आणि मुद्रा प्रेरणा केवळ पाहून शिकत होती हे त्यांच्या लक्षात आलं.

असं म्हणतात की कलेला भाषेचं बंधन नसतं. हे प्रेरणाच्या रुपानं प्रत्यक्षात पाहायला मिळालं. शमिता महाजन यांनी अनंत अडचणींचा सामना करून त्यांनी प्रेरणाना एक ऊर्जा आणि नृत्यातली योग्य दिशा दिली. 12 वर्षांच्या प्रयत्नातून कर्णबधिर मुलगी ताल आणि सुरावर उत्तम भरतनाट्यम् करू शकते हे प्रेरणानं सिद्ध केलं. प्रेरणाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 29, 2020, 8:45 AM IST
Tags: career

ताज्या बातम्या