Success Story : अपंगत्वावर मात करून सौम्या झाली IAS,देशात मिळवलं नववं रँकिंग

दिल्लीच्या सौम्या शर्माने 16 व्या वर्षीच ऐकू येण्याची क्षमता गमावली. ऐकण्यासाठी तिला श्रवणयंत्राची मदत घ्यावी लागते. पण यामुळे खचून न जाता तिने निर्धाराने IAS चा अभ्यास करायचं ठरवलं. अवघ्या 23 व्या वर्षी तिने अभ्यास सुरू केला आणि कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षेची तयारी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 07:06 PM IST

Success Story : अपंगत्वावर मात करून सौम्या झाली IAS,देशात मिळवलं नववं रँकिंग

दिल्ली, 10 ऑगस्ट : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. त्यातच पहिल्याच प्रयत्नात IAS होणं ही आणखीनच अवघड बाब. पण ही यशोगाथा अशा एका मुलीची आहे जिने तिच्या अपंगत्वावर मात करून IAS परीक्षेत मोठं यश मिळवलं.

दिल्लीच्या सौम्या शर्माने 16 व्या वर्षीच ऐकू येण्याची क्षमता गमावली. ऐकण्यासाठी तिला श्रवणयंत्राची मदत घ्यावी लागते. पण यामुळे खचून न जाता तिने निर्धाराने IAS चा अभ्यास करायचं ठरवलं. अवघ्या 23 व्या वर्षी तिने अभ्यास सुरू केला आणि कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षेची तयारी केली.

भारताशी व्यापार बंद करणं पाकिस्तानला पडलं महाग, ईदसाठी नाही पैसे

सौम्या सांगते, माझ्यासाठी यूपीएससीची परीक्षा देणं हे इतर कोणतीही परीक्षा देण्यासारखंच होतं. अभ्यासाचं नीट प्लॅनिंग केलं आणि ते काटेकोरपणे अमलात आणलं तर ही परीक्षाही सोपी होते.सौम्याने दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून LLB पूर्ण केलं. 2017 मध्ये तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. त्याच वर्षी तिने प्रिलिम्स आणि मेन्सची परीक्षा दिली.

Loading...

सौम्या कर्णबधिर असल्यामुळे तिचा समावेश अपंगांसाठीच्या श्रेणीत केला गेला. पण तिने याला नकार दिला आणि नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या श्रेणीतच यूपीएससीचा फॉर्म भरला.

डॉ. पायल तडवीनंतर मुंबईत आणखी एका महिला डॉक्टरची आत्महत्या

यूपीएससी परीक्षेची तयारी तर तिने जोरात केली पण ऐन परीक्षेच्या वेळी तिला ताप आला. असं असलं तरी तिचा निर्धार पक्का होता. तिच्या डॉक्टर आईवडिलांनी तिला यावेळी मदत केली. तिने परीक्षा दिली आणि चमकदार यशही मिळवलं.

शाळेपासून सौम्या एक बुद्धिमान विद्यार्थिनी होती. त्यामुळेच शालेय शिक्षणातच माझा बेस पक्का झाला, असं ती सांगते. ज्यांना यूपीएससी द्यायची आहे त्यांनी रोज वर्तमानपत्र बारकाईने वाचलं पाहिजे, मॉडेल प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे आणि ज्या विषयात परीक्षा द्यायची आहे त्याच्यावर पकड मिळवली पाहिजे, असं तिचं सांगणं आहे.

=======================================================================================================

अलमट्टी धरणात मिळताना कृष्णेचं रौद्ररूप, पाहा हा ड्रोन VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: careerupsc
First Published: Aug 10, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...