Success Story: शेतकऱ्याचा मुलगा ते वैज्ञानिक, पुण्याच्या अक्षय तावळेचा प्रेरणादायी प्रवास

Success Story: शेतकऱ्याचा मुलगा ते वैज्ञानिक, पुण्याच्या अक्षय तावळेचा प्रेरणादायी प्रवास

एखाद्या शास्त्रज्ञासोबत काम करावं, असं अक्षयचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. पुण्यामधल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये इंटर्नशिप करत असताना अक्षयची विज्ञानाशी गट्टी जमली. त्यानंतर त्याने शास्त्रीय संशोधन करण्याचा निर्धार केला.

  • Share this:

पुणे, 1 ऑगस्ट : इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही तुमचं ध्येय गाठूच शकता हे दाखवून दिलं आहे, पुण्याच्या अक्षय तावळेने. अक्षयचे वडील शेतकरी आहेत. अवाढव्य फी भरून शिक्षण घेणं अक्षयला शक्य नव्हतं. त्यामुळेच त्याचं शालेय शिक्षण पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये झालं. पण नंतर मात्र त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर तिरुपतीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळवली.

एखाद्या शास्त्रज्ञासोबत काम करावं, असं अक्षयचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. पुण्यामधल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये इंटर्नशिप करत असताना अक्षयची विज्ञानाशी गट्टी जमली. त्यानंतर त्याने शास्त्रीय संशोधन करण्याचा निर्धार केला. अक्षयला पुण्यामधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. तिथेच त्याची निवड सायन्स नर्चर प्रोग्रॅमसाठी झाली.

(वाचा : 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शिक्षणमंत्र्यांची घोषणा )

खरंतर 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी DISHA नावाचा एक उपक्रम राबवला जातो. याच उपक्रमाच्या माध्यमातून अक्षयला आपल्या कौशल्याची जाणीव झाली. शास्त्रीय संशोधनाची दिशा त्याला इथेच मिळाली. यानंतर त्याने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेची प्रवेश परीक्षा दिली आणि या संस्थेत तो दाखल झाला.

स्वत:वर विश्वास ठेवून जर तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार केलात तर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता, असं अक्षय म्हणतो. शेतकरी वडिलांच्या सोबत शेतात कष्ट करणारा अक्षय आता शास्त्रज्ञांच्या खांद्याला खांदा लावून संशोधन करणार आहे. आता अक्षयला मूलभूत संशोधनामध्ये करिअर करायचं आहे.

एका छोट्याशा गावातून येऊन, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारा हा तरुण विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधक म्हणून नाव कमवण्यासाठी सज्ज झाला आहे. वैज्ञानिक होण्याचा ध्यास घेऊन त्या ध्यासापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

=======================================================================================

VIDEO : 'मातोश्री'वरून 25 वेळा फोन आले, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

First published: August 2, 2019, 8:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading