Home /News /career /

घरी बसून प्रचंड कंटाळा येतो; काहीतरी वेगळं करायचंय? मग लाईफ चेंजिंग ठरतील 'ही' कामं; आताच करा सुरु

घरी बसून प्रचंड कंटाळा येतो; काहीतरी वेगळं करायचंय? मग लाईफ चेंजिंग ठरतील 'ही' कामं; आताच करा सुरु

आताच सुरु करा 'ही' कामं

आताच सुरु करा 'ही' कामं

आज आम्ही तुम्हाला असे काही काम (some important business to do at home) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 02 ऑगस्ट:आजकालच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला कमाईचं दुसरं साधन (How to find second source of income) हवंय. यासाठी कभी गृहिणींनी निरनिराळ्या क्षेत्रात जॉब जॉईन केले आहेत. मात्र अजूनही अशा काही महिला गृहिणी आहेत ज्यांना घरच्या कामात असताना स्वतःसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी (Business for home makers) वेळ मिळू शकत नाही. अनेक गृहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची घराला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असते. गृहिंणीनो, हीच तुमची इच्छा आता प्रत्यक्षात उतरू शकते. आज आम्ही तुम्हाला असे काही काम (some important business to do at home) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया. ट्रान्सलेशन ज्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे आणि किमान दोन भाषांचे ज्ञान आहे त्यांच्यासाठी भाषांतराचे कार्य अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. या कामात तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. भाषांतराचे काम काही संकेतस्थळांच्या मदतीने करता येते- fever.com, upwork.com, freelancer.com, guru.com, iFreelance.com. अशा काही वेबसाईट्स तुम्हाला मदत करू शकतात. 'तुमच्यातील महत्त्वाचे स्किल्स काय?' प्रश्नामुळे गोंधळू नका; Resume मध्ये 'हे' स्किल्स असेल तर जॉबची 100% गॅरेंटी ब्लॉगिंग जर तुम्ही घरी रिकामे बसले असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता. गेल्या दशकापासून ब्लॉग कमाईला वेग आला आहे. ब्लॉगची कमाई करण्यासाठी, तुम्ही Google Adsense मध्ये साइन इन करू शकता, जे तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर जाहिराती ठेवण्यासाठी देते आणि तुम्हाला पेज व्ह्यूनुसार पैसे दिले जातात. ऑनलाइन ट्यूटर ऑनलाइन शिकवणी आणि क्लासेसचा कल वाढला आहे. तुम्हाला कोणत्याही विषयात प्राविण्य असेल तर तुम्ही काही शाळांच्या मदतीने किंवा स्वतःहून ऑनलाइन शिकवणीचे काम सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या कामानुसार उत्पन्नही मिळते. योग शिक्षक किंवा संगीत शिक्षकही ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करू शकतात. काय नोकरी..काय शिक्षण.. काय करिअर! या शहरांमध्ये तरुणांची लाईफ एकदम ओक्के ऑनलाइन ई कॉमर्स दीर्घकाळापासून कोरोना संकटामुळे देशात ऑनलाइन मार्केटचे काम खूप वाढले आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन शॉप सुरू करण्याची ही सुवर्णसंधी ठरू शकते. यासाठी तुम्ही वस्तू मोठ्या प्रमाणात विकू शकता आणि ते घरबसल्या ऑनलाइन विकू शकता किंवा तुम्ही स्वतःचे उत्पादन पॅक करून ऑनलाइन विकू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job

    पुढील बातम्या