मुंबई, 11 मार्च- तुमच्यापैकी अनेकांनी सिग्मंड फ्रॉईड हे नाव ऐकलं किंवा त्याबद्दल वाचलं असेल. ऑस्ट्रियन न्यूरॉलॉजिस्ट असलेल्या फ्रॉईडनं सायकोअॅनॅलिससचा पाया रचलेला आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक वाक्याला अर्थपूर्ण मानलं जातं. फ्रॉईडच्या मते, प्रेम आणि अर्थपूर्ण काम या मानवी आयुष्यातील दोन सर्वांत अर्थपूर्ण गोष्टी आहेत. फ्रॉईडच्या या तत्त्वज्ञानाशी तुम्ही सहमत किंवा असहमत असू शकता. न्यूरोसायंटिस्ट मात्र फ्रॉईडशी सहमत असल्याचं दिसतं. त्यांचं असं मत आहे की, तुमचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त झाल्यानंतर आणि व्यावसायिकरित्या निवृत्त झाल्यानंतरही तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवलं पाहिजे. फक्त एक लक्षात ठेवा की, तुम्ही स्वतःला ज्यामध्ये व्यस्त ठेवता ती एकदमच क्षुल्लक बाब नसावी. 'इंडिया टुडे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
फ्रॉईडच्या तत्त्वज्ञानाशी मिळताजुळता एक हिंदी वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. तो म्हणजे, 'खाली दिमाग शैतान का घर'. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, अर्थपूर्ण आणि फलदायी असलेल्या गोष्टीत स्वत:ला व्यस्त ठेवणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही उद्देशाशिवाय एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रीत करणं हे दुःखाशी संबंधित आहे. ज्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
(हे वाचा:BAMS आणि MBBS मध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर माहिती )
सध्या जगभरात एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक लोक सेवानिवृत्त झाल्यानंतरही पुन्हा कामावर येत आहेत. निवृत्तीनंतरचं आयुष्य निरस वाटत असल्याच्या साध्या कारणासाठी ते पुन्हा कामावर येत आहेत. कधीही निवृत्त न होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या या वाढत्या संख्येनं अर्थशास्त्रज्ञांना एक नवीन संज्ञा तयार करण्यास भाग पाडलं आहे. अर्थशास्त्रज्ञांनी अशा लोकांसाठी 'अनिवृत्ती' (Unretirement) ही नवीन संज्ञा तयार केली आहे.
निवृत्तीनंतर पुन्हा कामावर येणं ही बाब वाटते तितकी सोपी नाही. तुमच्या वाढत्या वयामुळे कामाच्या वेळापत्रकात काही बदल आवश्यक असतात. यूएसएसारख्या देशांमध्ये, नियोक्ते सहसा असे बदल देऊ करत आहेत. उदाहरणार्थ, ते अशा कर्मचाऱ्यांसाठी कामाची योग्य वेळ, कामाचे कमी तास, झोपण्यासाठी खाट असलेली विश्रांतीची खोली इत्यादी देत आहेत. विशेष म्हणजे, यूएसए, कॅनडा, मेक्सिको आणि फिनलँडसारख्या अनेक पाश्चात्य देशांमध्ये वयानुसार भेदभाव करण्यावर कायद्याने बंदी आहे. अशा उपयुक्त उपाययोजना आणि कायदे भारतासाठी दूरचं वास्तव वाटत असलं तरी, आपल्या देशातही निवृत्तीनंतर अर्थपूर्ण व्यवसाय शोधण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांना निवृत्तीनंतर पुन्हा काम करण्याची इच्छा आहे त्यांना एक्सप्लोर करण्याजोगे पर्याय नक्कीच मिळतील.
(हे वाचा:रिटायर्ड आहात? घरी बसून कंटाळा आलाय? मग SBI मध्ये तुमच्यासाठी जॉबची संधी; अशी असेल पात्रता)
उदाहरणार्थ, तुम्हाला एक छंद म्हणून स्वयंपाक करायला आवडत असेल. तुमच्याकडे असलेल्या काही खास रेसिपीज तुम्हाला लोकांसोबत शेअर करायच्या आहेत. तर, तुम्ही तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू शकता. प्रायोजक आणि सदस्यत्वांच्या सहाय्यानं तुम्ही तुमच्या छंदाचं फायदेशीर व्यवसायात रुपांतर करू शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला बागकाम आवडत असेल तर तुम्ही एक छोटी रोपवाटिका सुरू करू शकता.
अनेक सेवानिवृत्त व्यक्ती समाजाच्या हितासाठी सेवाभावी संस्थांना त्यांची सेवा देतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही वंचित मुलांना शिकवू शकता. आर्थिक परताव्याच्या दृष्टीने हे काम फारसं योग्य नसलं तरी त्यातून एक अत्यंत समाधानकारक अनुभव नक्की मिळेल. मुद्दा फक्त हाच आहे की, निवृत्तीनंतर योग्य ठिकाणी मन रमवता आलं पाहिजे.
पण, जर तुम्ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक चिंतेने ग्रासलेले असाल तर तुमच्याकडून वरीलपैकी काहीही शक्य होणार नाही. अशावेळी एचडीएफसी लाइफ स्मार्ट पेन्शन योजनेसारख्या योजना तुम्हाला मदत करू शकतात. नावाप्रमाणेच, एचडीएफसी लाइफ स्मार्ट पेन्शन योजना ही एक स्मार्ट सेवानिवृत्ती योजना आहे जी तुम्हाला बिनधास्त जीवन जगण्यास मदत करते. या योजनेमुळे तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीची चिंता न करता नवीन छंद किंवा काम विकसित करता येतं. या योजनेसाठी तुम्ही एक किंवा मर्यादित पेमेंट टर्मसाठी प्रीमियम भरणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी वार्षिक उत्पन्नाची हमी मिळते.
एचडीएफसी लाइफ स्मार्ट पेन्शन योजना खूप लवचिक आहे. यातील सिंगल प्लॅन हा सिंगल आणि जॉईंट लाईफ दोन्हीची पूर्तता करतो. तुम्ही तुमची अॅन्युइटी रक्कम मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक स्वरुपात मिळवू शकता. लाइफ अॅन्युइटी, भरलेल्या एकूण प्रीमियमवरील टक्केवारीच्या परताव्यासह लाइफ अॅन्युइटी, तत्काळ रिटर्नसह लाइफ अॅन्युइटी व वाढती अॅन्युइटी असे चार पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Lokmat news 18