Success Story: सामोसे विकून केली कमाई,आता CA च्या परीक्षेत मिळवलं यश

शशिकांतच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे वडील मंदिरामध्ये पुजारी आहेत. त्यांची दिवसाची कमाई फक्त 200 रुपयांची. या पैशात घर चालवणं कठीणच होतं. मग शशिकांत आणि त्याच्या दोन भावांनी पैसे मिळवण्यासाठी सामोसे विकायला सुरुवात केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 06:55 AM IST

Success Story: सामोसे विकून केली कमाई,आता CA च्या परीक्षेत मिळवलं यश

मुंबई, 30 ऑगस्ट : ध्येय गाठण्यासाठीचा निर्धार पक्का असेल तर यश मिळतंच. ओडिशाच्या शशिकांत शर्माने हे खरं करून दाखवलं आहे. शशिकांतचा CA उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. शशिकांतच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे वडील मंदिरामध्ये पुजारी आहेत. त्यांची दिवसाची कमाई फक्त 200 रुपयांची. या पैशात घर चालवणं कठीणच होतं. मग घरची आर्थिक जबाबदारी शशिकांत आणि त्याच्या भावांनी उचलली. शशिकांत आणि त्याच्या दोन भावांनी पैसे मिळवण्यासाठी सामोसे विकायला सुरुवात केली. हे तिघंजण घराच्या जवळच सामोसे विकायचे. याच दरम्यान शशिकांतने त्याचं शिक्षण सुरूच ठेवलं. 2009 मध्ये तो दहावीची परीक्षा पास झाला. त्यानंतर त्याने कॉमर्सचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षकांनी त्याला CA ची परीक्षा देण्याचा सल्ला दिला. शशिकांतने ही परीक्षा पास होण्याचं मनावरच घेतलं.

एका दिवसात 18 तास अभ्यास

शशिकांतने CA च्या तयारीसाठी दिवसाला 18 तास अभ्यास केला. बऱ्याच वेळा अभ्यासाच्या तंद्रीत तो जेवण करायचंही विसरून जात असे. अभ्यास आणि अभ्यास हाच त्याचा मंत्र होता. आज याच कठोर मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे. गरिबीशी झुंजताना काही मार्ग उरला नाही तेव्हा शशिकांतने मामाकडून कर्ज घेतलं होतं. आता मात्र चांगला अभ्यास करून त्याने हे यश मिळवलं आणि कुटुंबीयांचे पांग फेडले.

(SBI ची 1 सप्टेंबरपासून योजनांची खैरात, करोडो ग्राहकांना होणार फायदा)

CA ची परीक्षा ही देशातल्या सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. शशिकांतने ही परीक्षा देण्यासाठी सहा वेळा प्रयत्न केले. अखेर सहाव्या प्रयत्नात तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला. शशिकांतची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.प्रतिकूल परिस्थितीतही निर्धार पक्का असेल तर यश मिळतंच हेच त्याने दाखवून दिलं आहे.

Loading...

====================================================================================================

SPECIAL REPORT : भुजबळांची घरवापसी होण्याआधी 'मातोश्री' वर नेमकं काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 06:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...