मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

फी भरण्यासाठी घेतलं कर्ज अनं गड्यानं मैदानच मारलं! देशातील सर्वात कठीण परिक्षा पास

फी भरण्यासाठी घेतलं कर्ज अनं गड्यानं मैदानच मारलं! देशातील सर्वात कठीण परिक्षा पास

कुलदीपचे वडील सूर्यकांत यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि आई मंजू यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, गरिबीतून जर बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं त्याचं मत होतं.

कुलदीपचे वडील सूर्यकांत यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि आई मंजू यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, गरिबीतून जर बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं त्याचं मत होतं.

कुलदीपचे वडील सूर्यकांत यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि आई मंजू यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, गरिबीतून जर बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं त्याचं मत होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : संयम आणि प्रामाणिकपणे सातत्याने मेहतन केली तर नशिबही सलाम करते असं म्हटलं जातं. असं एका तरुणासोबत घडलं आहे. घरची परिस्थिती साधारण, वडील सुरक्षा रक्षक आणि अशा परिवारातून येणाऱ्या मुलाने देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवित IRS रँक म्हणजे भारतीय महसूल सेवा ही रँक मिळवली आहे. कुलदीप द्विवेदी असं या लढवय्या तरुणाचं नाव आहे.

कुलदीप द्विवेदी या तरुणाचा जन्म उत्तर प्रदेशातील नोगोहा जिल्ह्यातील शेखपूर गावात झाला. त्याचे वडील सूर्यकांत द्विवेदी हे सिक्योरिटी गार्ड होते. तर आई गृहिणी होती. कुलदीपचे वडील सूर्यकांत यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि आई मंजू यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, गरिबीतून जर बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं त्याचं मत आहे. म्हणूनच मग त्यांनी संदीप, प्रदीप आणि स्वाती आणि कुलदीप या चार पाल्यांना मोठ्या कष्टाने वाढवलं.

सूर्यकांत द्विवेदी लखनौ विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. त्यावेळी त्यांचा पगार फक्त 1100 रुपये होता आणि त्यावरून 5 लोकांचे कुटुंब चालत होते. मुलांना शिकवण्यासाठी सूर्यकांत दिवसा शेतातही काम करायचे. त्यांनी आपल्या मुलांना अभ्यासापासून कधीच रोखले नाही. तसेच घरची परिस्थिती साधारण असल्याने अनेकदा फी भरण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. त्यांच्या मेहनतीला फळ हे 2015 मध्ये मिळाले. कारण 2015मध्ये अथक मेहनतीनंतर कुलदीपने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात प्रतिष्ठित UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

हेही वाचा - महाराष्ट्रपुत्राचा ओडिशात सन्मान, IAS मनोज महाजन झाले सुंदरगडचे CEO

चार भावंडांमध्ये कुलदीप हा अभ्यासात सर्वात हुशार होता. 2009 मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. 2011 मध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली. अलाहाबादमध्ये राहून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. त्यानंतर त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तो पीसीओच्या माध्यमातून कुटुंबीयांशी बोलत असे.

कुलदीप द्विवेदी 2015 मध्ये UPSC परीक्षेत बसला होता. तो त्याच्या पहिल्याच प्रयत्नात 242 व्या क्रमांकासह (IRS कुलदीप द्विवेदी रँक) यशस्वी झाला. त्याचे प्रशिक्षण ऑगस्ट 2016 मध्ये नागपुरात सुरू झाले. कुलदीपने यूपीएससी परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग घेतले नव्हते. इतर उमेदवारांकडून पुस्तके उधार घेऊन तो स्वयं अध्ययन करायचा. 2013 मध्ये त्याची सीमा सुरक्षा दलात असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली. पण त्याच्या मनात फक्त UPSC पास होणे हेच ध्येय होतं. त्याने ते पूर्ण केलं.

First published:

Tags: Success story, Upsc, Uttar pradesh