दमोह, 20 डिसेंबर : मध्य प्रदेशात (Madhya pradesh) पोट निवडणुका संपन्न झाल्या आहेत. यानंतर वादग्रस्त बीएसपीच्या आमदार रमाबाई या राजकारणातून ब्रेक घेत आहेत. त्या आता दहावीच्या ओपन बोर्डमधून परीक्षा देत आहेत. रमाबाई या दमोह जिल्ह्यातील पथरिया येथून आमदार आहेत. मध्यप्रदेशमधील राजकीय नाट्यानंतर रमाबाई चर्चेत आल्या होत्या. मार्चमध्ये त्यांना गुरुग्राममधील एका हॉटेलमधून काँग्रेस नेता कथित स्वरुपात मुक्त करुन आणलं होतं. रमाबाई यांना पहिल्यांदा काँग्रेस आणि त्यानंतर भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. सध्या रमाबाई आपल्या अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
लेक झाली शिक्षिका
आमदार रमाबाई यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, त्यांची मुलगी मेघा परिहार दिल्ली विद्यापीठात इतिहास विषयात पदती घेत आहे. ती माझी मेंटर आहे. रमाबाईनी आतापर्यंत 3 परीक्षा दिल्या आहेत, रविवारी त्या प्रॅक्टिकलची परीक्षा देतील. रमाबाई म्हणाल्या की, मी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करीत आहे.
विज्ञान कठीण जातं
रमाबाई यांची मुलगी मेघा परिहारने सांगितलं की, आईला विज्ञान अवघड जातं आणि गणितातील फॉर्म्युलांमुळे ती गोंधळते. तिचं इंग्रजी ठीक आहे आणि हिंदी खूप चांगली आहे. मेघा सध्या दिल्लीत UPSC चीदेखील तयारी करीत आहे आणि IAS होण्याची इच्छा आहे. रमाबाई यांना त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही, मात्र ती इच्छा त्या आता पूर्ण करीत आहेत.
गावात नव्हती शाळा
आमदार रमाबाई म्हणाल्या की, दमोह जिल्ह्यातील खोजखेडी सिमर गावात शाळा नसल्याने त्या पूढील शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यांना शाळेत जाण्यासाठी नदी पार करून जावं लागत होतं. ते खूप लांब होतं. याकारणाने त्यांना मध्येच शिक्षण सोडावं लागलं. दमोहमध्ये शिक्षण विभागाचे सहाय्यक निर्देशक पीपी सिंह यांनी सांगितलं की, ज्यांनी मध्येच परीक्षा सोडावी लागली, त्यांच्यासाठी येथे परीक्षेचे आयोजन केले जाते. सोबतच जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रवेश घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठीही ही परीक्षा फायदेशीर ठरते. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणारे कोणीही येथे एडमिशन घेऊ शकतात. याचा अभ्यासक्रमही इतरांप्रमाणे सोपा असतो.
लेकीने वाढवली आमदार आईची हिंमत
मेघाने सांगितलं की, तिची आई नवीन विचार चांगल्या प्रकारे समजू शकते. मी व माझ्या वडिलांनी तिला परीक्षाला बसण्यास सांगितलं. सुरुवातील आई संकोच करीत होती, मात्र त्यानंतर तिचाही आत्मविश्वास वाढला. रमाबाई म्हणाल्या की, माझं औपचारिक शिक्षण मध्येच सूटलं असलं तरी शिकण्याचं काम सतत सुरू आहे. विधानसभेच्या कामासाठी खूप अभ्यास करावा लागतो. याशिवाय मी 35 हिंदी कादंबऱ्याही वाचल्या आहेत.