मुंबई, 06 सप्टेंबर: कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण देशात शाळा आणि कॉलेजेस (School and colleges reopen) बंद आहेत. मात्र आता कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे आता देशभरातील काही राज्यांनी शाळा पुन्हा सुरु (Schools Reopen) करण्याबाबत विचार सुरु केला आहे. त्यानुसार आजपासून आसाम या राज्यामध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसंच महाराष्ट्रातही (Maharashtra Schools Reopen date) शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होणार आहे.
देशातील आसाम, कर्नाटक या राज्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा या राज्यांमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. तसंच जम्मू- काश्मीरमध्येही दहावी आणि बारावीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातही कोरोनाची स्थिती दिलासादायक आहे. त्यामुळे राज्यातही शाळा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय लवकरच घेण्याचा विचार आहे. त्यात ता हळूहळू सर्व निर्बंध शिथिल (Corona Unlock) होऊ लागले आहेत. दुकानं आणि मॉल्सही सुरु करण्यात आले आहेत. मात्र शाळा कधीपासून सुरु होणार (When Schools Reopen in Maharashtra) हा प्रश्न शाळांना, शिक्षकांना आणि पालकांना पडला आहे.
हे वाचा - वाह रे पठ्ठ्या! कंपनीनं क्रेडिट कार्ड देण्यास दिला नकार तर सुरु केली कंपनी
काही दिवसांपूर्वी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील शाळा लवकरच सुरु करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली होती. मात्र इतर राज्यांमध्ये कोरोणचा प्रादुर्भाव वाढत आहे म्हणून विचार करून निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले होते. मात्र काही राज्यांमधील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यासंदर्भात कधी निर्णय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विद्यार्थ्यांना अजूनही लस नाही
शाळा सुरु कारण्यासासंदर्भातील सरकारचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला असावा कारण शाळेतील विद्यार्थी हे 18 वर्षांखालील असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना अजूनही कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) देण्यात आली नाहीये. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुद्दा लक्षात घेता आता शाळा सुरु करणं धोक्याचं ठरू शकतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र सरकार यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.