Home /News /career /

विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उन्हाळ्याची सुट्टी संपली; राज्यात 'या' तारखेपासून सुरु होतील सर्व शाळा

विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उन्हाळ्याची सुट्टी संपली; राज्यात 'या' तारखेपासून सुरु होतील सर्व शाळा

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये होणार शाळा सुरू

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये होणार शाळा सुरू

राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे

    मुंबई, 09 जून: देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये उन्हाळी परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. त्यात आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु (Maharashtra school reopen) होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुढील शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु होणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. Career After 12th: बारावीनंतर ग्रॅज्युएशन कोर्सला प्रवेश घेताय? जरा थांबा.. आधी 'या' IMP गोष्टी वाचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील शाळा 15 जून (Maharashtra School) रोजी सुरु (Maharashtra school opening date) होणार आहेत. तर 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 13 आणि 14 जूनला शाळेत येऊन संपूर्ण शाळेची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करणं तसंच कोरोनाचे सर्व नियम अचूक पाळावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचना विदर्भ वगळता इतर सर्व जिल्ह्यांसाठी असणार आहेत. विदर्भातील शाळा उशिरा जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता विदर्भातील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होणार आहे. दि. 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भातील शाळांबाबत दि. 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन दि. 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत बोलावण्यात यावं असे निर्देश शिक्षण आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. MH BOARD 10TH RESULT: 12वीनंतर आता 10वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला; कधी लागेल निकाल? समोर आली माहिती कोरोनाचे सर्व नियम बंधनकारक शाळा सुरु करताना सुरुवातीला शाळा आणि इतर कर्मचाऱ्यांना शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थ्यांनाही कोरोनाचे सर्व नियम पाळूनच शाळेत यायचं आहे असेही आदेश देण्यात आले आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Education, Maharashtra News, School

    पुढील बातम्या