स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. नियमीत आणि कॉन्ट्रॅक्ट अशा दोन्ही स्वरुपाच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार भरती प्रक्रियेत यशस्वी होतील त्यांना १५ लाख पासून ५२ लाखांपर्यंत पगार मिळेल.
या पदासांठी ९ जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. ३० जानेवारीपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसेल. फक्त मुलाखतीच्या आधारे तुम्हाला नोकरी मिळेल.
योग्यता- वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी योग्यता निश्चित करण्यात आली आहेत.
अर्जाची फी-
सामान्य वर्ग- ६०० रुपये
आरक्षित वर्ग- १०० रुपये
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावरच होईल. जर दोन उमेदारांना मुलाखतीत समान गूण मिळाले तर वयाने मोठ्या असलेल्या उमेदवाराला संधी देण्यात येईल.
असा करा अर्ज-
सर्वातआधी एसबीआयची अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जा.
तुमची खाजगी माहिती भरुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
मागितलेली महत्त्वपूर्ण माहिती देऊन फॉर्म पूर्ण भरा.
अर्जाची फी भरून प्रक्रिया पूर्ण करा.
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठीची डिरेक्ट लिंक https://ibpsonline.ibps.in/sbisrcojan19/reg_start.php
Special Report : शरद पवारांना पंतप्रधानपद खुणावतंय का?