मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Recruitment 2023: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नोकरी करण्याची संधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

SBI Recruitment 2023: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नोकरी करण्याची संधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

निवडलेल्या उमेदवारांची एका वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाईल. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च:  2017 मध्ये देशातील अनेक बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीनीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे ही देशातील सर्वांत मोठी बँक झाली आहे. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वांत मोठी बँक ठरू शकेल. हजारो शाखांचा कारभार सुरळीतपणे पार पडण्यासाठी बँकेला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यासाठी बँक वेळोवेळी कर्मचाऱ्यांची भरती करत असते. आताही एसबीआयनं कराराच्या आधारावर सपोर्ट ऑफिसर पदासाठी कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. एसबीआय 2023 भरती अधिसूचनेनुसार, सपोर्ट ऑफिसरपदाच्या नऊ जागा रिक्त आहेत. निवडलेल्या उमेदवारांची एका वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाईल. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना हैदराबाद येथे नियुक्त केलं जाईल. 'स्टडी कॅफे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

क्या बात है! आता परदेशात जॉबसाठी वाट बघण्याची गरजच नाही; 'या' देशांमध्ये मिळतोय जॉब सीकर Visa

एसबीआय 2023 भरती अधिसूचनेनुसार, या पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 63 वर्षे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 मार्चपासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 23 आहे.

पोस्टचं नाव आणि संख्या: एसबीआय 2023 भरती अधिसूचनेनुसार, सपोर्ट ऑफिसरपदाच्या नऊ जागा रिक्त आहेत.

पे स्केल: या पदांसाठी श्रेणीनुसार 40 हजार ते 45 हजार रुपये दरमहा असा पगार देण्यात येणार आहे.

Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

कार्यकाळ: निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एका वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्त केलं जाईल. नंतर हा कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता:

अर्जदार एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी असल्यानं त्यांना कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. सीएमपीओसीमध्ये या पूर्वी काम केलेल्या, सीएमपीओसीच्या ऑपरेशनचं पुरेसं ज्ञान, कार्यप्रदर्शनाचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड, सिस्टीम्स आणि प्रक्रियांचं चांगलं ज्ञान असलेल्या माजी अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल.

देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती

पात्रता निकष:

अर्ज करणारा माजी अधिकारी वयाच्या 60 व्या वर्षी बँकेच्या सेवेतून निवृत्त झालेला असावा. अर्जदार स्वेच्छेनं सेवानिवृत्त झालेला असल्यास/ राजीनामा दिलेला असल्यास/ निलंबित झालेला किंवा त्याने बँक सोडलेली असल्यास त्यांच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. CDO/P&HRD-PM/58/2015-16 dated 07.10.2015 & CDO/P&HRD-PM/12/2017-18 dated 05.05.2017 या सर्क्युलरलानुसार जर एखादा उमेदवार सध्या 58 वर्षांचा आहे आणि त्यानं 30 वर्षे बँकेत नोकरी केलेली आहे, त्याला पेन्शन मिळत असो किंवा नसो तो 60 वर्षांचा झाल्यानंतर या नोकरीसाठी अर्ज करू शकतो.

निवड प्रक्रिया: सपोर्ट ऑफिसर पदासाठी शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Jobs Exams, SBI, SBI bank, Sbi bank job, SBI Bank News