Jobs in SBI : देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये SBI अधिकारीपदावर नोकरीची संधी खुली होत आहे. देशातल्या या सर्वांत मोठ्या सरकारी बँकेने sbi.co.in वरून व्हेकन्सीची माहिती दिली आहे. अर्जप्रक्रिया आणि डेडलाईनसंदर्भात अधिक वाचा...

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 03:24 PM IST

Jobs in SBI : देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज

मुंबई, 22 जुलै : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये SBI नोकरीची संधी खुली होत आहे. देशातल्या या सर्वांत मोठ्या सरकारी बँकेने आपल्या वेबसाईटवरून व्हेकन्सीची माहिती दिली आहे. स्टेट बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात SBI ने नोटिफिकेशन जारी केलं आहे. स्टेट बँकेत वरीष्ठ स्तरावरच्या 77 जागा भरायच्या आहेत. व्यवस्थापक लेव्हलच्या या जागा आहेत.

स्टेट बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपव्यवस्थापक आणि विशेष अधिकारी दर्जाच्या पदांची भरती होणार आहे. Deputy General Manager (DGM) Specialist Cadre Officer (SCO)या दोन पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 77 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांची आणि अर्ज कसा करायचा, कुठे करायची याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर त्यासाठी लॉगऑन करावं लागेल. SBI च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या साईटवरूनच ऑनलाईन अर्ज करायची सोय बँकेने उपलब्ध करून दिली आहे.

Loading...

अॅप्लिकेशन डेडलाईन

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, SCO आणि DGM पदांसाठीची रिक्रूटमेंट प्रोसेस 22 जुलै म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहे. 12 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

हेही वाचा : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना नौदलात नोकरीची संधी, 'अशी' होईल फिटनेस चाचणी

उमेदवार कुठल्याही एकाच पोस्टसाठी अर्ज करू शकतात, अशी अट नमूद करण्यात आली आहे.

स्टेट बँकेची जी अधिकारी पदं भरायची आहेत, त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

Deputy General Manager: 1 post

SME Credit Analyst: 11 posts

SME Credit Analyst: 4 posts

SME Credit Analyst: 10 posts

Credit Analyst: 30 posts

Credit Analyst: 20 posts

क्रेडिट अॅनालिस्ट या पदासाठी सर्वाधिक जागा भरायच्या आहेत.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवारांना SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. त्यासाठी sbi.co.in या वेबसाईटवर SBI Recruitment 2019 या टॅबवर क्लिक करा.

हेही वाचा : एका रात्रीत झाले पैसे दुप्पट, शेअर बाजारातल्या महागुरूच्या या काही टिप्स

याशिवाय डायरेक्ट SBI vacancies असा सर्च देऊनसुद्धा या लिंकपर्यंत जाता येईल.

Apply Online या टॅबवर क्लिक करून लॉगईन करा आणि आपली माहिती भरा. काळजीपूर्वक अर्ज भरल्यानंतर अर्ज करायची फीसुद्धा ऑनलाईन भरावी लागेल.

हेही वाचा : Facebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक!

खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 750 रुपये अॅप्लिकेशन फी निर्धारित करण्यात आली आहे. General/ OBC/EWS कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी एवढी फी लागू होईल. राखीव गटातल्या उमेदवारांसाठी अर्जशुल्कात सवलत देण्यात आली आहे SC/ST/PWD कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी 125 रुपये अॅप्लिकेशन फी द्यावी लागेल.

----------------------------------------------------------------------------------------

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...