SBI PO 2020-21 : स्टेट बँकेच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहायचा जाणून घ्या

SBI PO 2020-21 : स्टेट बँकेच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहायचा जाणून घ्या

SBI PO साठी झालेल्या प्रीलिम्सचे निकाल जाहीर झाले आहेत. Sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगीन करून निकाल कसे पाहायचे ते वाचा..

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सोमवारी, 18 जानेवारी रोजी राज्य शासकीय बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO) भरतीसाठी प्राथमिक परीक्षेचा (Prelim) निकाल आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. SBI PO ची प्राथमिक परीक्षा 4, 5 आणि 6 जानेवारी रोजी देशभरात विविध केंद्रावर घेण्यात आली होती.

प्रिलीम्ससाठी उपस्थित असलेले उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट वर लॉगीन करून किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपली जन्मतारीख आणि रोल नंबर सहित लॉगीन करावं लागेल.

एसबीआय पीओ प्रीलिम्सचा निकाल कसा पहावा जाणुन घ्या:

१) एसबीआय बँकेच्या एसबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

२) एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाच्या करिअर विभागावर जा

३) नवीन घोषणा विभागात एसबीआय पीओ निकालाच्या लिंकवर क्लिक करा

४) आपला रोल नंबर आणि जन्मतारीखा टाकून सबमीट वर क्लिक करा

५) आपला निकाल स्क्रीनवर दिसेल

ज्या उमेदवारांनी एसबीआय पीओ प्रिलिम्सची परीक्षा यशस्वीरीत्या पात्र केली आहे ते मुख्य परीक्षेस पात्र आहेत. एसबीआय पीओ मेन्ससाठी प्रवेशपत्र लवकरच एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध होतील.

एसबीआय पीओ मेन्ससाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा ही 29 जानेवारी, 2021 ला होणार आहे.

First published: January 19, 2021, 2:42 PM IST

ताज्या बातम्या