मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SBI मध्ये Clerk व्हायचंय? मग नक्की कधी जारी होणार नोटिफिकेशन? समोर आली मोठी अपडेट

SBI मध्ये Clerk व्हायचंय? मग नक्की कधी जारी होणार नोटिफिकेशन? समोर आली मोठी अपडेट

तुम्हीही बँकेत जॉब (How to do jobs in banks) करू इच्छित असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. SBI Clerk च्या नोटिफिकेशनची (SBI Clerk Notification Date) वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

तुम्हीही बँकेत जॉब (How to do jobs in banks) करू इच्छित असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. SBI Clerk च्या नोटिफिकेशनची (SBI Clerk Notification Date) वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

तुम्हीही बँकेत जॉब (How to do jobs in banks) करू इच्छित असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. SBI Clerk च्या नोटिफिकेशनची (SBI Clerk Notification Date) वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 ऑगस्ट: आजकालच्या काळात कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, आणि इतरही क्षेत्रातील अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रांकडेवळू लागले आहेत. बँकेत जॉब करण्यासाठी लाखो उमेदवार दरवर्षी अर्ज करू लागले आहेत. दरवर्षी लाखो तरुण या देशात सरकारी नोकरीची तयारी करतात. त्यातही ते बँक जॉब आणि UPSC यांना त्यांच्या सर्वोच्च प्राधान्यावर ठेवतात. सरकारी बँकेत नोकरी मिळणे सोपे नाही. बँकेच्या परीक्षा (banking Exam Preparation) खूप कठीण असतात आणि त्यासाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात स्पर्धा भयंकर वाढली आहे. मात्र तुम्हीही बँकेत जॉब (How to do jobs in banks) करू इच्छित असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. SBI Clerk च्या नोटिफिकेशनची (SBI Clerk Notification Date) वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI लवकरच लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. दरवर्षी SBI लिपिक भरतीची अधिसूचना जानेवारी ते एप्रिल दरम्यान जारी केली जाते. मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत याबाबत कोणतेही अपडेट आलेली नाही.

इंडियन आर्मी आता JEE Mains च्या मार्कांवर करणार भरती; 'या' तारखेपर्यंत करा Apply

मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार, आता या भरतीची अधिसूचना SBI लवकरच जारी केली जाणार आहे. अहवालात असं सांगण्यात आलं आहे की एसबीआय लिपिक भरतीची अधिसूचना ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केली जाऊ शकते. मात्र उमेदवारांना स्पष्ट तारखांसाठी SBI च्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. .

पदवी उत्तीर्ण उमेदवार SBI लिपिक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. परीक्षेची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे निश्चित केली आहे. परीक्षेअंतर्गत पेपरच्या दोन फेऱ्या होतात. ज्यामध्ये प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा समावेश होतो. प्रीलिम्समध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जातं. यंदा ही परीक्षा येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा

SBI क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. त्यानुसार एकूण 100 गुणांचा पेपर तयार केला जातो. यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड (QA) मधून ३५ प्रश्न आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातात. या परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना 1 तास देण्यात आला आहे.

आता B.Com आणि M.Com साठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच नाही; असं घरबसल्या घ्या शिक्षण

SBI लिपिक मुख्य परीक्षा

एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी मिळते. लिपिक मुख्य परीक्षेत ४ विषयांमधून प्रश्न विचारले जातात. यात रिझनिंग आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्यूडमधील 60 गुणांचे 50 प्रश्न असतात. इंग्रजी विषयातून 40 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. QA मधून 50 गुणांचे 50 प्रश्न विचारले जातात आणि आर्थिक जागरूकता विषयातून 50 प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेत एकूण 200 गुणांचे 190 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असते.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, SBI