नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : रेल्वे भरती सेलने पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती काढली आहे. जाहिरातीनुसार, रेल्वेच्या हावडा, सियालदाह, आसनसोल, मालदा, कांचरापारा, लिलुआ आणि जमालपूर विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3366 जागा रिक्त आहेत. या अप्रेंटिसशिप ट्रेनी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 4 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 3 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. यासाठी तुम्ही रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या www.rrcer.com या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. नोटीसनुसार, अर्ज केल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या अप्रेंटिसशिप ट्रेनी भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता उत्तीर्ण असावे. यासह, उमेदवाराकडे NCVT / SCVT द्वारे जारी केलेले ट्रेड सर्टिफिकेट देखील असावे, नोटीसनुसार, रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावे. पात्रतेच्या आधारे अप्रेंटिसशिप ट्रेनीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
हे वाचा - 50000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन या Two Wheeler, कोणत्या आहेत या बजेट इलेक्ट्रिक बाईक्स?
रिक्त पदांचा तपशील-
हावडा विभाग - 659 पदे
सियालदाह विभाग - 1123 पदे
आसनसोल विभाग - 412 पदे
मालदा विभाग - 100 पदे
कांचरापारा विभाग - 190 पदे
लिलुआ विभाग - 204 पदे
जमालपूर विभाग - 678 पदे
अर्ज शुल्क-
सामान्य श्रेणीच्या (ओपन) उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, SC/ ST/ PWBD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://139.99.53.236:8443/rrcer/NOTIFICATION%20ACT%20APPRENTICE%202020-21.pdf
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, Railway jobs