SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 2 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 2 हजार व्हॅकेन्सीपैकी 810 सामान्य पदं, 540 ओबीसी, 200 ईडब्ल्यूएस आणि 150 पदं एसटी कॅटेगरीसाठी असणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : SBI PO Recruitment 2020 स्टेट बँक ऑफ इंडियाने, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर आहे. अ‍ॅप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे.

एसबीआय ऑनलाईन प्रिलिमिनरी परीक्षा 31 डिसेंबर, 2, 4 आणि 5 जानेवारी, 2021 रोजी आयोजित करणार आहे. तर याच्या रिझल्टची घोषणा जानेवारी 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात होईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 2 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 2 हजार व्हॅकेन्सीपैकी 810 सामान्य पदं, 540 ओबीसी, 200 ईडब्ल्यूएस आणि 150 पदं एसटी कॅटेगरीसाठी असणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) -

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट आलेला नाही, तेदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. परंतु इंटरव्ह्यूला त्यांना 31 डिसेंबर, 2020 पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.

डायरेक्ट अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी फी (Application Fees) -

सामान्य, EWS आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना 750 रुपये अ‍ॅप्लिकेशन फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: November 17, 2020, 7:29 AM IST

ताज्या बातम्या