Sarkari Naukri 2021: ISRO मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी केवळ आजचा दिवस शिल्लक

इस्रो (ISRO) किंवा नासा (NASA) यासारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, ही संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही. परंतु आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पद भरती प्रक्रिया (Recruitment) सुरू केली आहे.

इस्रो (ISRO) किंवा नासा (NASA) यासारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, ही संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही. परंतु आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पद भरती प्रक्रिया (Recruitment) सुरू केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जुलै: इस्रो (ISRO) किंवा नासा (NASA) यासारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, ही संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही. परंतु आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Indian Space Research Organization) पद भरती प्रक्रिया (Recruitment) सुरू केली आहे. इच्छुक आणि योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज केल्यास त्यांना या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते आणि त्यांचे स्वप्न साकार होऊ शकते. मात्र अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. या पदभरती संदर्भात नोटिफिकेशन (Notification) जारी करण्यात आले असून, संबंधित इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी नोटिफिकेशन पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Indian Space Research Organization) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांकरिता अर्ज भरण्याची मुदत उद्यापर्यंत आहे. त्यामुळे ज्या इच्छूक उमेदवारांनी अजूनही पदासाठी अर्ज दाखल केला नसेल त्यांनी isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा. याठिकाणी 43 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती होणार आहे. हे वाचा-Government Job : BECILमध्ये अनेक पदांवर होतेय भरती; वाचा सविस्तर माहिती पदवी अप्रेंटिसच्या या पदांवर होणार भरती - सिव्हिल इंजिनिअरिंग – 3 पदे - मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 1 पद - कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग – 1 पद - इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 1 पद - इलेक्ट्रॉनिक्स अँड  कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – 3 पदे - इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग – 2 पदे - फायर टेक्नोलॉजी – 2 पदे हे वाचा-सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर इथे मोठी पदभरती; 75 हजार रुपये मिळणार पगार डिप्लोमा अप्रेंटिसची रिक्त पदे - सिव्हिल इंजिनिअरिंग – 3 पदे - मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 2 पदे - कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग – 2 पदे - इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 3 पदे ही शैक्षणिक पात्रता आवश्यक पदवी अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित ट्रेडमधील इंजिनिअरिंगची पदवी (Degree) असणे आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डिप्लोमा (Diploma) आवश्यक आहे. हे वाचा-CBSE Class 10th Result: 'या' तारखेपर्यंत लागणार 10वीचा निकाल; आली मोठी अपडेट Sarkari Naukri 2021 : अशी असेल निवड प्रक्रिया या विविध पदांसाठी अशी असेल उमेदवार निवड प्रक्रिया - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पॅनेलने तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार त्यांची निवड केली जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांना जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमधून अधिक माहिती मिळवता येईल या गोष्टी ठेवा लक्षात अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै अधिकृत वेबसाइट- isro.gov.in
First published: