• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Sarkari Naukri 2021: कृषी वैज्ञानिक बोर्डात या पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Sarkari Naukri 2021: कृषी वैज्ञानिक बोर्डात या पदांसाठी भरती, असा करा अर्ज

कृषी वैज्ञानिक भरती मंडळाने (Agricultural Scientist Recruitment Board) पद भरती प्रक्रिया सुरु करुन शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्यांना एक संधीच उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही शासकीय नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 जुलै : सध्या कोरोनामुळे एकूणच नोकऱ्या आणि रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यातच अनेक उमेदवार योग्य नोकरीच्या शोधात आहेत. त्यातही शासकीय नोकरीला अनेकांचे प्राधान्य असते. त्यामुळे कृषी वैज्ञानिक भरती मंडळाने (Agricultural Scientist Recruitment Board) पद भरती प्रक्रिया सुरु करुन शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्यांना एक संधीच उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही शासकीय नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण कृषी वैज्ञानिक भरती मंडळाने विविध पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. या माध्यमातून तुम्हा शासकीय सेवेची संधी मिळणार आहे. एकूण 65 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कृषी वैज्ञानिक भरती मंडळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह (Administrative Officer) विविध पदांच्या भरतीकरिता प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार मंडळाच्या www.asrb.org.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरु शकतात. जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार (Notification) एकूण 65 रिक्त पदांच्या भरतीकरिता ही प्रक्रिया राबवली जात आहे. Sarkari Naukri 2021 : या पदांसाठी होणार भरती - प्रशासकीय अधिकारी – 44 पदे - फायनान्स अॅण्ड अकाउंट ऑफिसर्स – 21 पदे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता अशी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच सर्व उमेदवारांना कॉम्प्युटर (Computer) वापरण्याबाबत माहिती असणं आवश्यक आहे. अशी आहे पदांसाठी वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षादरम्यान असावे. उमेदवाराच्या वयाची गणना 23 जुलै 2021 पासून केली जाईल. कमाल वयोमर्यादेतील ओबीसी (OBC) वर्गाला तीन वर्ष आणि एससी (SC) आणि एसटी (ST) वर्गाला पाच वर्षांची सूट दिली जाईल. अर्जाचे शुल्क प्रशासकीय अधिकारी या पदासाठी सामान्य वर्ग आणि ओबीसी वर्गासाठी 480 रुपये परीक्षा शुल्क आणि 20 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कात सूट दिली जाईल, तसंच त्यांना केवळ 20 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. निवड प्रक्रिया या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या (Written Test) माध्यमातून केली जाईल. या भरती बाबत अधिक माहितीसाठी संबंधित इच्छुक उमेदवारांनी जारी केलेली नोटिफिकेशन पाहावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
First published: