• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी होणार भरती; दररोज 450 रुपये मिळणार भत्ता

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी होणार भरती; दररोज 450 रुपये मिळणार भत्ता

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  सांगली, 11 ऑक्टोबर:  सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत (Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021) 10वी पास उमेदवारांसाठी लवकरच काही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) जारी करण्यात आली आहे. प्रजनन तपासक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्रजनन तपासक (Breeding Checkers Male) - एकूण जागा 25 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   प्रजनन तपासक (Breeding Checkers Male) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवारांचं वय 18 ते 43 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रजनन तपासक (Breeding Checkers Male) - उमेदवारांना 450/- रुपये दैनिक भत्ता मिळणार आहे.म्हणजेच पंचवीस दिवसांचे एकूण 11,250/- रुपये मिळणार आहेत. हे वाचा- Government Jobs: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी असं असेल कामाचं स्वरूप दॆणादीं घरांना भेट देऊन डास अळी शोधणे. तसंच दररोज किमान 250 घरांना भेट देऊन पाणी भरलेले दूषित भांडे रिकामे करणे. अळीनाशकाच्या मदतीनं स्वच्छता ठेवणे. विशेष सूचना ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे मनपाशी याचा काहीही संबंध नाही. 100/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र तयारकरून द्यावं लागेल. उमेदवारांची निवड ही इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उत्तर शिवाजी नगर, सांगली. हे वाचा-  महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल इथे दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation
  या पदांसाठी भरती प्रजनन तपासक (Breeding Checkers Male) - एकूण जागा 25
  इतका मिळणार पगार 450/- रुपये दैनिक भत्ता मिळणार आहे.म्हणजेच पंचवीस दिवसांचे एकूण 11,250/- रुपये
  शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक
  अर्ज पाठवण्याचा पत्ता RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उत्तर शिवाजी नगर, सांगली.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://smkc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: