मुंबई, 03 जानेवारी: कोरोनाकाळात ऑनलाईन परीक्षा द्याव्या लागल्या मात्र आता विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षांची सवय झाली आहे. ऑफलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अभ्यासही करावा लागतो आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना आता तिमाही परीक्षा झाल्या आहेत आणि रिझल्टही लागले आहेत. तर आता येत्या काही महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षांची तयारी सुरु केली आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला सॅम्पल पेपर्स सोडवण्याचा सल्ला अनेकांनी दिला असेल.
सॅम्पल पेपर्स सोडवणं म्हणे परीक्षेसाठी अजून तयार करणं आहे. सॅम्पल पेपर्स सोडवल्यामुळे परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातील याची कल्पना येते. हे विद्यार्थ्यांना त्यांच्या मंडळांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास तयार करते. नमुना पेपर सोडवल्याने तयारी वाढते आणि चिंता कमी होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता नववीच्या सर्व विषयांचे सॅम्पल पेपर्स देणार आहोत . ज्यामधून तुम्ही चांगला अभ्यास करू शकाल आणि चांगले मार्क्स मिळवू शकाल. Topper Learning च्या माध्यमातून हे सॅम्पल पेपर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी Topper Learningचे Exam Prep App अभ्यासासाठी फायद्याचं ठरत आहे. एक लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केलेलं हे अॅप विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्यासाठीचं एक चांगलं व्यासपीठ आहे. जाणून घेऊया टॉपर लर्निंगचं एक्झाम प्रेप अॅप का निवडायचं?
एक्झाम प्रेप अॅप हे नव्या शिक्षण साधनांचे केंद्र आहे. अभ्यासासाठी प्रश्नांचे संच इथे उपलब्ध असून आपल्या ज्ञानाची तात्काळ चाचणी घेता येते. शाळेतल्या क्लासरूमनंतर हे अॅप तुमचा असा मित्र आहे ज्याच्याकडे सर्वात कठीण अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. इतकंच नाही तर काही मिनिटात सर्व शंकांचे समाधान होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Education, Maharashtra News, State Board