मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Salary Negotiation Tips: नोकरीदरम्यान चांगलं पॅकेज हवंय? मग असा मांडा तुमचं मत

Salary Negotiation Tips: नोकरीदरम्यान चांगलं पॅकेज हवंय? मग असा मांडा तुमचं मत

Salary Negotiation Tips: नोकरीदरम्यान चांगलं पॅकेज हवंय? मग असा मांडा तुमचं मत

Salary Negotiation Tips: नोकरीदरम्यान चांगलं पॅकेज हवंय? मग असा मांडा तुमचं मत

Salary Negotiation Tips: बरेच लोक मुलाखत चांगली देतात परंतु जेव्हा पगाराचा प्रश्न येतो तेव्हा ते अडकतात. काहीवेळा उमेदवारांना अपेक्षित वेतन मिळू शकत नाही. परंतु यासाठी काही कौशल्यं असणं अत्यंत आवश्यक आहे, त्यांच्या मदतीनं लोकांना त्यांच्या अनुभवानुसार अपेक्षित पगार मिळू शकतो.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 ऑगस्ट: आजच्या युगात प्रत्येकाला चांगल्या नोकरीची अपेक्षा असते. पण मेहनत आणि अभ्यासाशिवाय नाव आणि पैसा असलेली नोकरी मिळणं खूप अवघड आहे. अनेकांना मुलाखती देऊन नोकरी मिळत असली, तरी त्यांना पाहिजे तसा पगार मिळत नाही. यामागं अनेक कारणं आहेत. ज्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही. फक्त नोकरी मिळणं पुरेसे नाही, जोपर्यंत त्या नोकरीत चांगला अनुभव किंवा चांगलं सॅलरी पॅकेज मिळत नाही. तोपर्यंत करिअरला वेग येणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Salary Negotiation Tips) सांगणार आहोत, ज्या तुम्हाला हवा असलेला पगार मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.

अपेक्षित पगारासाठी रिसर्च करा-

तसं पगाराच्या चर्चेसाठी, एखाद्यानं प्रथम एचआरच्या ऑफरची प्रतीक्षा केली पाहिजे. पण आता हा ट्रेंड झपाट्यानं बदलत आहे. त्यांच्या पात्रतेनुसार, कोणतेही उमेदवार त्यांचे वेतन पॅकेज एचआर व्यवस्थापकाला सांगू शकतात. मात्र त्यासाठी बाजारात सॅलरी पॅकेज काय सुरू आहे, हे आधी पाहावं लागेल. यानंतर असं पॅकेज सांगा ज्यामध्ये रिक्रूटरच्या मागणीची स्वतःशी संतुलित करता येईल.

प्लॅन बी तयार ठेवा-

चांगली नोकरी शोधणाऱ्यांनी त्यांचा बॅकअप पर्यायही तयार ठेवावा. म्हणजेच त्यांच्याकडे तुमच्यासोबत अतिरिक्त ऑफर लेटरही तयार असेल. कारण उमेदवाराकडे आधीच दुसर्‍या रिक्रूटरचे ऑफर लेटर असल्यास, याचा देखील नोकरी देणाऱ्यावर खूप परिणाम होईल. यामुळे उमेदवार अधिक आत्मविश्वासानं आपलं म्हणणं मांडू शकेल.

हेही वाचा- क्या बात है! आता B.Com आणि M.Com साठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच नाही; असं घरबसल्या घेता येईल शिक्षण

वर्षभरात दोन वेतनवाढीची मागणी करा

जर रिक्रूटरनं कमाल मूळ पगार दिल्याचं म्हटलं, तर त्यासोबत साइन ऑन बोनसची डिमांड करा. हे शक्य नसेल तर वर्षभरात किमान 2 वेतनवाढीची मागणीही रिक्रूटर करता येईल. यानंतर, निश्चित निष्कर्ष काढूनच तुमचं बोलणं संपवा.

योग्य पगार मागा-

मुलाखती दरम्यान, नेहमी तुमच्या योग्यतेनुसार नेमका पगार सांगा. कारण पगार हा कोणत्याही उमेदवाराचा अनुभव दर्शवतो. अशा स्थितीत अनुभवाप्रमाणेच पगाराची मागणी करा.

First published:

Tags: Job