मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Railway मध्ये व्हेकन्सी; 10वी आणि 12वी पास उमेदवारांनाही संधी

Railway मध्ये व्हेकन्सी; 10वी आणि 12वी पास उमेदवारांनाही संधी

Railway

Railway

Railway मध्ये व्हेकन्सी; 10वी आणि 12वी पास उमेदवारांनाही संधी. वाचा कधी, कसं अप्लाय करायचं

नवी दिल्ली, 6 जून: सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये अनेक पदं रिक्त आहेत. त्यासाठी दक्षिण रेल्वेने (southern railway) विविध विभाग, कार्यशाळा, युनिटमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविले आहेत. रेल्वेकडून 3,378 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज (online applications)  करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांवर भरतीसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी sr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. रेल्वेतील या सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (last date of application) 30 जून आहे. तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी ही बातमी वाचा. पदांची तपशिलवार माहिती - कॅरेज वर्क्स, पेरम्बूर- 936 पदं गोल्डनरॉक वर्कशॉप – 756 पदं सिग्नल आणि टेलीकॉम वर्कशॉप, पोदनूर – 1686 पदं एकूण रिक्त पदांची संख्या – 3378 हे ही वाचा: नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी पात्रता- फिटर, पेंटर आणि वेल्डर पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून कमीतकमी 50% गुणांसह दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण केली पाहिजे. तर मेडिकल लॅब टेक्नीशियन (रेडियोलॉजी, पॅथोलॉजी, कार्डियोलॉजी) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी 50 टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयात 12वीची परीक्षा पास केलेली पाहिजे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय कोर्स (ITI course) पास केलेला असावा. वयोमर्यादा – इच्छुक उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच फ्रेशर किंवा आयटीआय आणि एमएलटी केलेल्यांसाठी 22 आणि 24 वर्षे वयोमर्यादा (age limit) ठेवण्यात आली आहे. यापेक्षा जास्त वयाचे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. हे ही वाचा:NBE Recruitment: 12 वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी अर्ज फी - जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. निवड कशाप्रकारे होणार - ex-ITI कॅटगरीच्या उमेदवारांची निवड 10वी आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच एमएलटी पोस्टसाठी (MLT post) 12वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. अर्ज कसा करणार - इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या sr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.  तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि वर दिलेल्या पदांसाठी पात्र असाल रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
First published:

Tags: Career opportunities, Railway jobs

पुढील बातम्या