Home /News /career /

RRB NTPC Protests: वादग्रस्त निकालसंदर्भात अखेर रेल्वेकडून उच्चस्तरीय समिती स्थापन; कधी निघणार तोडगा?

RRB NTPC Protests: वादग्रस्त निकालसंदर्भात अखेर रेल्वेकडून उच्चस्तरीय समिती स्थापन; कधी निघणार तोडगा?

विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार अशी चिन्हं

विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार अशी चिन्हं

आता यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वे विभागानं (Railway department) एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी: गेल्या तीन दिवसांपासून बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही भागांमध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचं कारण ठरला तो RRB NTPC या भरती परीक्षेचा निकाल (RRB NTPC Result 2022). निकालामध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा करण्यात आला आहे आणि त्याच त्याच उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे असा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन (RRB NTPC Protests) सुरु केलं आहे. हे आंदोलन अक्षरशः इतकं चिघळलं आहे की अनेक रेल्वेगाड्या आई रेल्वे स्टेशन्सचं आंदोलकांनी नुकसान (Reason behind RRB NTPC Protests) केलं आहे. दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली आहे.  आता यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वे विभागानं (Railway department) एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. रेल्वे मंत्रालयानं (Ministry of Railways) 26 जानेवारीला नोटीस जारी करून याबाबत माहिती दिली. नोटीसमध्ये म्हटलं आहे की, 'ही समिती RRBs द्वारे आयोजित NTPC CBT 1 च्या निकालांवरील उमेदवारांच्या तक्रारींचं पुनरावलोकन करेल. तसंच, ग्रुप डी पदांच्या भरतीसाठी CBT 2 जोडण्यासंबंधीच्या तक्रारींचीही चौकशी केली जाईल. त्यामुळे आतातरी या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार अशी चिन्हं दिसू लागली आहेत. देशात भरती परीक्षांमध्ये का वाढतंय गैरप्रकारांचं प्रमाण? यामागील कारण काय? वाचा कधीपर्यंत करता येणार तक्रारी या परीक्षासंदर्भातील कोणत्याही समस्यांसाठी उमेदवार 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत NTPC आणि गट D संबंधी त्यांच्या समस्या रेल्वे मंत्रालयाकडे पाठवू शकतात. यासाठी त्यांना बोर्डानं जारी केलेल्या अधिकृत ईमेल आयडीवर मेल पाठवावा लागेल - rrbcommittee@railnet.gov.in. शेवटच्या तारखेनंतर पाठवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत असं RRB कडून सांगण्यात आलं आहे. या तारखेला होणार निर्णय उमेदवारांच्या तक्रारी आणि सूचनांचे पुनरावलोकन केल्यानंतर, समिती आपला अहवाल 4 मार्च 2022 पर्यंत RRB ला सादर करेल. सध्या, विरोध लक्षात घेता, बोर्डाने RRC स्तर 1 च्या NTPC CBT 2 आणि CBT 1 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 26 जानेवारी 2022 रोजी नोटीस जारी करून याबाबत माहिती दिली. Career Tips: डिजिटल दुनियेत करिअर करायचंय? मग या क्षेत्रांमध्ये कमवा भरघोस पैसे काय आहे विद्यार्थ्यांची मागणी CBT 1 अर्थात संगणक-आधारित चाचणीचे निकाल नुकतेच 14 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या 1 कोटींहून अधिक उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी विहित निवड प्रक्रियेअंतर्गत सात टप्प्यांत घेण्यात आले होते. 2022. झाले होते. आरआरबीने जाहीर केलेल्या निकालांबाबत उमेदवारांचा मोठा विरोध आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पहिल्या स्तरावरील यशस्वी उमेदवारांच्या यादीत अनेकांकडे एकापेक्षा जास्त पदांसाठी रोल नंबर आहेत. विविध पदांसाठी युनिक रोल नंबर जाहीर करावेत, अशी उमेदवारांची मागणी आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Exam, Jobs, Protest, Railway jobs

    पुढील बातम्या