मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

RRB Group D Exam: उमेदवारांनो, लवकरच जाहीर होणार परीक्षेची तारीख; Admit Card ही होणार जारी; बघा डिटेल्स

RRB Group D Exam: उमेदवारांनो, लवकरच जाहीर होणार परीक्षेची तारीख; Admit Card ही होणार जारी; बघा डिटेल्स

आता लवकरच या परीक्षेच्या तारखांची (RRB Group D Exam Date) घोषणा होणार आहे.

आता लवकरच या परीक्षेच्या तारखांची (RRB Group D Exam Date) घोषणा होणार आहे.

आता लवकरच या परीक्षेच्या तारखांची (RRB Group D Exam Date) घोषणा होणार आहे.

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: दोन वर्षांपूर्वी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनं (RRB) RRB Group D च्या भारतीयांबत भरतीबाबत (RRB Group D Recruitment) घोषणा केली होती. तेव्हापासूनच या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी  सुरुवात केली होती. परीक्षा कधी होणार (RRB Group D exam) याची प्रतीक्षा सर्वजण करत होते. मात्र आता लवकरच या परीक्षेच्या तारखांची (RRB Group D Exam Date) घोषणा होणार आहे. यासाठीचे admit cards (RRB Group D Exam Admit Card) ही जारी केले जाणार आहेत.

RRB ने मार्च 2019 मध्ये 1.03 लाखापेक्षा जास्त पदांवर या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून परीक्षा होऊ शकली नाही. परंतु, हळूहळू परिस्थिती सुधारल्यानं भरती परीक्षांची फेरी पुन्हा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, आरआरबी ग्रुप डी भर्ती 2021 भरती परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते.

हे वाचा -  SEC Railway Recruitment: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर इथे 339 जागांसाठी भरती

असं असेल परीक्षेचं स्वरूप

आरआरबी ग्रुप Dची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त 15 भाषांमध्ये घेतली जाईल. आरआरबी ग्रुप D परीक्षेमध्ये उमेदवारांना सर्व विषयांमधून एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. उमेदवारांना हे प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटं दिली जाणार आहे. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1 गुण असेल तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

यंदा ही भरती परीक्षा अनेक टप्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या घेतलेल्या सर्व भरती परीक्षांमध्ये कोविड नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. सुमारे 1.15 कोटी उमेदवारांनी आरआरबी ग्रुप डी भर्ती परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत, कोरोनामुळे एकावेळी अनेक उमेदवारांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे ही भरती परीक्षा ही अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Entrance exam, Exam, Jobs, Railway jobs