Home /News /career /

RRB Group D Exam: रेल्वेकडून 'या' उमेदवारांना मिळणार फ्री ट्रॅव्हल पास; कधी होणार परीक्षेच्या तारखांची घोषणा? वाचा

RRB Group D Exam: रेल्वेकडून 'या' उमेदवारांना मिळणार फ्री ट्रॅव्हल पास; कधी होणार परीक्षेच्या तारखांची घोषणा? वाचा

आता रेल्वेकडून काही उमेदवारांना फ्री ट्रॅव्हल पास देण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर:  रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) ने मार्च 2019 मध्ये 1.03 लाखापेक्षा जास्त पदांवर RRB Group D  या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून परीक्षा होऊ शकली नाही. आता हळूहळू परिस्थिती सुधारल्यानं भरती परीक्षांची फेरी पुन्हा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आरआरबी ग्रुप डी भर्ती 2021 (rrb group d exam date 2021 latest news today) भरती परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते. सप्टेंबर महिन्याच्या शेवट्पर्यंत या तारखांची घोषणा (rrb group d exam date) केली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार आता रेल्वेकडून काही उमेदवारांना फ्री ट्रॅव्हल पास देण्यात येणार आहे. खरं म्हणजे हा ट्रॅव्हल पास उमेदवारांना पाहिजे आहे की नाही? याबाबत उमेदवारांना रजिस्ट्रेशनच्या वेळी विचारण्यात आलं होतं. त्यानुसार ज्या उमेदवारांनी या पाससाठी अर्ज केला होता अशा उमेदवारांना फ्री ट्रॅव्हल पास मिळणार आहे. हे वाचा - 10वी उत्तीर्ण उमेदवारांना Railway देणार ट्रेनिंग; आज शेवटची तारीख; लगेच करा अर्ज कसा मिळेल पास? ज्या उमेदवारांनी फ्री ट्रॅव्हल प[पासची निवड केली होती त्यांचे प्रवासी पास प्रवेशपत्रासह (rrb group d exam date 2021 admit card) जारी केले जातील. याशिवाय RRB ने प्रवेशपत्राबद्दल माहिती दिली आहे की कोणत्याही उमेदवाराचे प्रवेशपत्र पोस्टद्वारे पाठवले जाणार नाही, त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी rrbcdg.gov.in ला भेट द्यावी लागेल. असं असेल परीक्षेचं स्वरूप (rrb group d exam pattern) आरआरबी ग्रुप Dची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त 15 भाषांमध्ये घेतली जाईल. आरआरबी ग्रुप D परीक्षेमध्ये उमेदवारांना सर्व विषयांमधून एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. उमेदवारांना हे प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटं दिली जाणार आहे. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1 गुण असेल तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हे वाचा - महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय यंदा ही भरती परीक्षा अनेक टप्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या घेतलेल्या सर्व भरती परीक्षांमध्ये कोविड नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. सुमारे 1.15 कोटी उमेदवारांनी आरआरबी ग्रुप डी भर्ती परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत, कोरोनामुळे एकावेळी अनेक उमेदवारांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे ही भरती परीक्षा ही अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Railway jobs

    पुढील बातम्या