मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

RRB Group D: 19 सप्टेंबरपासून सुरु होणार ग्रुप डी परीक्षा; कधी जारी होणार Admit Cards? मोठी अपडेट समोर

RRB Group D: 19 सप्टेंबरपासून सुरु होणार ग्रुप डी परीक्षा; कधी जारी होणार Admit Cards? मोठी अपडेट समोर

फिझिकल आणि मेडिकल टेस्टचे निकष

फिझिकल आणि मेडिकल टेस्टचे निकष

RRB Group D परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत. येत्या 19 सप्टेंबरपासून ही परीक्षा सुरु होणार आहे. म्हणूनच हॉल तिकिट्स लवकरच येणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 सप्टेंबर: आपल्या देशात सरकारी नोकरीला वेगळंच महत्त्वं आहे. त्यामुळेच दरवर्षी लाखो विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी अभ्यास करत असतात. त्यात Railway ही उमेदवारांची पहिली पसंती असते. दरवर्षी रेल्वेच्या जागांसाठी लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात. अशाच RRB Group D परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत. येत्या 19 सप्टेंबरपासून ही परीक्षा सुरु होणार आहे. म्हणूनच हॉल तिकिट्स लवकरच येणार आहेत.

रेल्वे भर्ती बोर्ड, RRB 19 सप्टेंबरपासून ग्रुप डी परीक्षा आयोजित करणार आहे. ज्यांचे प्रवेशपत्र आरआरबी लवकरच जारी करू शकते. साधारणपणे परीक्षा सुरू होण्याच्या चार ते पाच दिवस आधी प्रवेशपत्र जारी करण्यात येतात. म्हणूनच आता RRB ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र आज म्हणजेच 14 सप्टेंबर किंवा 15 सप्टेंबर रोजी जारी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता हे Courses

प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, परीक्षेला बसणार असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यासाठी त्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. यापूर्वी, RRB ने परीक्षेसाठी परीक्षा सिटी स्लिप देखील जारी केली आहे. जे rrbcdg.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

असं डाउनलोड करा तुमचं हॉल तिकीट

सुरुवातीला अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in ला भेट द्या.

त्यानंतर होम पेजवर दिलेल्या 'कॉम्प्युटर-आधारित-चाचणी (CBT) परीक्षेसाठी प्रवेशपत्र' या लिंकवर जा.

यानंतर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

आता प्रवेशपत्र तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.

ते डाउनलोड करा आणि सेव्ह करून प्रिंट करून ठेवा.

परीक्षा क्रॅक करण्यासाठी मॉक टेस्ट द्या

कोणत्याही परीक्षेची तयारी करताना मागील वर्षाचे पेपर सोडवा. यामुळे परीक्षेच्या पॅटर्नची योग्य माहिती मिळेल. यासोबतच परीक्षा हॉलमध्ये पेपर कसा सोडवायचा याचा सरावही केला जाणार आहे. जुने पेपर सोडवल्याने तुम्ही परीक्षेसाठी किती तयार आहात याचेही आकलन होऊ शकते.

First published:

Tags: Career opportunities, Exam Fever 2022, Jobs Exams, Railway, Railway jobs