रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये सब इन्स्पेक्टर (SI) पदासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी ही परीक्षा ९ जानेवारीला होणार होती. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षेचं रिवाइज शेड्युल लवकरच अधिकृत वेबसाइट si.rpfonlinereg.org वर टाकण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना एसएमएसमार्फत याबद्दल माहिती दिली जाणार आहे.
केरळमध्ये सुरू असलेल्या अशांतीमुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. केरळमध्ये ५ जानेवारीला परीक्षा होणार होती. ही परीक्षा काल १० तारखेला झाली. इतर उमेदवारांना वाट पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या परीक्षेमार्फत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये ९७३९ पदांसाठी भरती होणार आहेत.
ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलगू, कोंकणी, मल्याळम, कन्नड, गुजराती, बंगाली, आसामी, ओडिआ, मणिपूरी आणि पंजाबी अशा १५ भाषांमध्ये होणार आहे.
Special Report : शरद पवारांना पंतप्रधानपद खुणावतंय का?