रेल्वे सुरक्षा दलाने १० वी पास उमेदवारांसाठी काढली बंपर भरती, असा करा अर्ज

रेल्वे सुरक्षा दलाने १० वी पास उमेदवारांसाठी काढली बंपर भरती, असा करा अर्ज

जर तुम्ही बेरोजगार आहात तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक नोकऱ्यांची संधी घेऊन येत आहे.

  • Share this:

जर तुम्ही बेरोजगार आहात तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक नोकऱ्यांची संधी घेऊन येत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबल पदाच्या जागा भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०१९ पासून ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत तुम्ही या जागांसाठी अर्ज करू शकता. एकुण ७९८ पदांसाठी भरती होणार आहे.

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)- ४५२ जागा

कॉन्स्टेबल (सफाई कामगार)- १९९ जागा

कॉन्स्टेबल (वॉशरमॅन)- ४९ जागा

कॉन्स्टेबल (हेअर ड्रेसर)- ४९ जागा

कॉन्स्टेबल (माळी)- ७ जागा

टेलर (ग्रेड ३)- १४ जागा

कॉबलर (ग्रेड ३)- २२ जागा

योग्यता-

उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी किंवा एसएसएलसी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

आर्युमर्यादा-

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २५ वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे.

अर्जाची रक्कम-

पदासाठी अर्ज करताना सामान्य आणि ओबीसी वर्गाला ५०० रुपये फी तर एससी, एसटी, महिला आणि अल्पसंख्यांक २५० रुपये फी भरणं गरजेचं आहे.

निवड प्रक्रिया-

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, शारीरिक परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर होणार.

असा भरा अर्ज-

या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आरपीएफची अधिकृत वेबसाइट rpfonlinereg.co.in वर जाऊन अर्ज करू शकता.

First published: January 5, 2019, 1:44 PM IST

ताज्या बातम्या