मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रोजगार मेळाव्यात मोदींकडून 71,000 Appointment letter, ‘या’ शहरातील तरुणांना मिळाली नोकरीची संधी

रोजगार मेळाव्यात मोदींकडून 71,000 Appointment letter, ‘या’ शहरातील तरुणांना मिळाली नोकरीची संधी

रोजगार मेळाव्यात मोदींकडून 71,000 नियुक्ती पत्र जारी, ‘या’ शहरातील तरुणांना मिळाली नोकरीची संधी

रोजगार मेळाव्यात मोदींकडून 71,000 नियुक्ती पत्र जारी, ‘या’ शहरातील तरुणांना मिळाली नोकरीची संधी

जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. दिवाळीनिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यात देशभरातून निवडक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. आता पुन्हा एकदा रोजगार मेळाव्यात 71,056 नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 22 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'रोजगार मेळा' कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व नवीन नियुक्त्यांसाठी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल - ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स लाँच केला. पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळाव्यात 71,056 नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदे दीड वर्षात मिशन मोडमध्ये भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. रोजगार मेळाव्यात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भाषण केलं. आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील तरुणांना नियुक्तीपत्र देण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील. भारतासारख्या तरुण देशात आपले कोट्यवधी युवक ही या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. केंद्र सरकार आपल्या तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, ज्याचा राष्ट्र उभारणीत जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे.

दिवाळीनिमित्त नियुक्तीपत्रांचेही वाटप करण्यात आलं-

जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. दिवाळीनिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यात देशभरातून निवडक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क नियुक्ती तसेच केंद्रीय सशस्त्र दल, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, कनिष्ठ लिपिक (एलडीसी), स्टेनो, पीए, टॅक्स इन्स्पेक्टर, रेल्वे एमटीएस यासारख्या पदांचा समावेश होता.

हेही वाचा: भारतीय आयटी सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्यांची संधी! इन्फोसिसच्या सह-संस्थापकांनी दिली माहिती

या शहरांतील तरुणांना मिळाली नियुक्तीपत्रे-

पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळाव्यात 71,056 नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदे दीड वर्षात मिशन मोडमध्ये भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. रायपूर, नवी दिल्ली, पणजी, गुरुग्राम, पोर्ट ब्लेअर, विशाखापट्टणम, इटानगर, गुवाहाटी, पाटणा, श्रीनगर, उधमपूर, जम्मू, रांची, हजारीबाग, बंगलोर, तिरुवनंतपुरम, लेह, भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, पुणे, नागपूर, इंफाळ, शिलाँग आयझॉल, दिमापूर, भुवनेश्वर आणि जालंधर इत्यादी 45 शहरांचा समावेश आहे. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदीं म्हणाले की, भारतासारख्या तरुण देशात आपले कोट्यवधी युवक ही या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. केंद्र सरकार आपल्या तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, ज्याचा राष्ट्र उभारणीत जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे.

First published: