Home /News /career /

CA परीक्षेत देशात पहिली आली 19 वर्षांची नंदिनी; मोठा भावालाही मिळाली रँक

CA परीक्षेत देशात पहिली आली 19 वर्षांची नंदिनी; मोठा भावालाही मिळाली रँक

सौजन्य- IE

सौजन्य- IE

Chartered Accountants final examination (new course) मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आहे नंदिनी अगरवाल हिने. वयाच्या फक्त 19 व्या वर्षी नंदिनी CA झाली आहे. तिचा सख्खा मोठा भाऊसुद्धा देशात 18 वा आलाय.

  नवी दिल्ली, 13 सप्टेंबर: चार्टर्ड अकाउंटंट अर्थात CA परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. देशात 83,606 विद्यार्थी CA final परीक्षेला बसले होते. यामधून Chartered Accountants final examination (new course) देशात पहिला क्रमांक मिळवला आहे नंदिनी अगरवाल हिने. विशेष म्हणजे वयाच्या फक्त 19 व्या वर्षी नंदिनी सनदी लेखापाल अर्थात CA झाली आहे. एवढंच नाही तर तिचा सख्खा भाऊ सचिन अगरवाल हादेखील सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला असून तो देशात 18 वा आला आहे.

  काही अवघड परीक्षांपैकी एक मानली जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सीएची परीक्षा गणली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणं हेच मोठं यश मानलं जातं. अशा वेळी अगरवाल परिवारातल्या सख्ख्या भावंडांनी एकाच वर्षी मिळवलेलं यश अभूतपूर्व आहे. नंदिनी अगरवाल 19 व्या वर्षीच सीए झाली आहे तर तिचा मोठा भाऊ सचिन 21 व्या वर्षी हीच परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.

  TCS Rebegin: TCS मध्ये महिलांसाठी होणार बंपर भरती; अशा पद्धतीनं करा अर्ज

  मध्य प्रदेशातल्या मोरेना जिल्ह्यातल्या अगरवाल कुटुंबासाठी आजचा दिवस मोठ्या आनंदाचा ठरला. सख्ख्या भावंडांनी देशपातळीवरच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं.  सचिन अगरवाल देशात 18 व्या क्रमांकावर आहे. (AIR 18) तर नंदिनीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नंदिनी अगरवालला 800 पैकी 614 गुण मिळाले आहेत.

  Infosys Reskilling: इन्फोसिसनं देशातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्स केले जाहीर

  इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या बातमीनुसार नंदिनी आणि सचिन पहिल्यापासून एकत्र अभ्यास करायचे. एकमेकांना प्रोत्साहन तर द्यायचेच पण एकमेकांच्या चुका सांगत टीकाकार म्हणूनही काम करायचे. घरापासूनच स्पर्धा सुरू झाल्याने अभ्यासाला हुरूप आल्याचं नंदिनी सांगते. नंदिनीने लहानपणीच दोन इयत्ता सोडून प्रवेश मिळवला. तिच्या अभ्यासातली प्रगती बघता तिला वरच्या तुकडीत घालण्यात आलं. त्यामुळेच ती मोठ्या भावाच्या इयत्तेतच शिकली.

  First published:

  Tags: Exam result

  पुढील बातम्या