• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • #RescheduleNEETUG: इतर परीक्षा पुढे ढकलल्या NEET परीक्षेची तारीखही पुढे ढकला; ट्विटरवर अनेकांची मागणी

#RescheduleNEETUG: इतर परीक्षा पुढे ढकलल्या NEET परीक्षेची तारीखही पुढे ढकला; ट्विटरवर अनेकांची मागणी

ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर चांगलीच जोर धरत आहे. तसा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Central Minister Dharmendra Pradhan) यांनी काही दिवसांपूर्वी NEET च्या UG परीक्षेची (NEET UG Exam 2021) तारीख जाहीर केली होती.  त्यानुसार NEET UG Exam (NEET UG Exam 2021 Date) येत्या 12 सप्टेंबर 2021 ला घेण्यात येणार आहे. डॉक्टर होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET ही परीक्षा देणं गरजेचं असतं. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती म्हणून आता ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनही (NEET UG Exam 2021 Registration) केलं आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव बघून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर चांगलीच जोर धरत आहे. तसा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. सध्या #RescheduleNEETUG हा हॅशटॅग वापरून लाखो नेटकरी NEET UG पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. JEE ऍडव्हान्स ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते तर  NEET UG ही परीक्षा का नाही? असा सवालही अनेक नेटकरी विचारत आहेत. काही जणांच्या ट्विटप्रमाणे यंदा NEET परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला आहे. तसंच या नवीन पॅटर्नमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर काही जणांच्या ट्विटप्रमाणे भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी सेंटर्सवर पोहोचू शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता यावं म्हणून तारीख पुढे ढकलण्याची मागणी होतेय. हे वाचा - WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे तब्बल 1281 जागांसाठी बंपर भरती; या लिंकवर करा अर्ज मात्र या सर्व मागण्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, देश आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना परीक्षा घेण्याची घाई का? असा सवाल करत परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागण्या जास्त आहेत. सध्या ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. त्यामुळे आता खरंच या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात येणार का? की वेळेतच परीक्षा होणार? हे बघणं महत्त्वाचं असेल.
  Published by:Atharva Mahankal
  First published: