• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • JEE Advanced 2021: परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची तारीख बदलली; आता 'या' तारखेपासून होणार नोंदणी

JEE Advanced 2021: परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची तारीख बदलली; आता 'या' तारखेपासून होणार नोंदणी

JEE Advanced 2021 साठी रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: संपूर्ण देशभरात नुकतीच JEE Mains 2021 परीक्षा पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा यंदा काही टप्प्यांमध्ये घ्यावी लागली.   त्यानुसार आता ही परीक्षा घेण्यात आली आणि निकाल लावण्यात येणार आहे. जे विद्यार्थी JEE Mains 2021 मध्ये उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना JEE Advanced 2021 परीक्षा देता येणार आहे. मात्र आता JEE Advanced 2021 साठी रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखेत (JEE Advanced 2021 Registration date) बदल करण्यात आला आहे. आयआयटी खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जेईई मेन 2021 च्या निकालातील विलंबामुळे JEE Advanced 2021 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख बदलली जात आहे. त्यामुळे आता नवीन तारखांची घोषणा करण्यात आली आहे. हे वाचा - Mumbai Job Alert: मुंबई विद्यापीठ इथे विविध पदांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज या असतील नवीन तारखा रजिस्ट्रेशनची नवीन तारीख: 13 सप्टेंबर, 2021 नोंदणीची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर, 2021, सायंकाळी 5 पर्यंत. फी भरण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर, 2021, सायंकाळी 5 पर्यंत JEE Advanced 2021 ही परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांची रँकिंग अडीच लाखाच्या खाली राहणार आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थी JEE Mains 2021 च्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published: