मुंबई, 16 नोव्हेंबर: शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र यांनी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या फॉर्मूलानुसार महाराष्ट्र FYJC प्रवेश 2021 (Maharashtra FYJC Admission 2021) साठी पहिली फेरी सुरू केली आहे. विद्यार्थी 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत नवीन नोंदणी अर्ज (Registration for Maharashtra FYJC Admission 2021) फॉर्म भाग-1 भरू शकतात. महाराष्ट्र FYJC प्रवेश अर्ज 11thadmission.org.in वरून भरता येतील. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह (First Come First Serve) या फॉर्मूलावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे.
अशा पद्धतीनं करता येणार अर्ज
11thadmission.org.in ही FYJC प्रवेशाची अधिकृत वेबसाइट ब्राउझ करा,
होमपेजवर 'New Registration' टॅबवर क्लिक करा.
सर्व आवश्यक माहिती भरा.
सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि FYJC अर्ज सबमिट करा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
मोठी बातमी! CBSE आणि CISCEच्या बोर्ड परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल
काही महत्त्वाच्या तारखा
16 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 ते 22 नोव्हेंबर 2021 दुपारी 12:00 PM- नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाचा फॉर्म भाग-1 भरणे, DYDE मध्ये फॉर्म पडताळणी, प्रवेश रद्द करणे आणि कोटा रिक्त जागा सरेंडर करणे
16 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 ते 22 नोव्हेंबर 2021 दुपारी 12:00 PM- ज्या विद्यार्थ्यांनी 10वी उत्तीर्ण केली आहे आणि ATKT मिळवले आहे त्यांना FCFS अंतर्गत अर्ज करून ऑनलाइन वाटप केले जाईल. यासाठी Participate in FCFS वर क्लिक करा.
16 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 ते 22 नोव्हेंबर 2021 06:00 PM- वाटप केलेले विद्यार्थी 'प्रवेशासाठी पुढे जा' वर क्लिक करा आणि वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात तुमचा प्रवेश निश्चित करा. कोटा प्रवेश आणि द्वि-फोकल प्रवेश सुरू राहतील.
22 नोव्हेंबर 2021 रात्री 08:00 पर्यंत- कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची स्थिती अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.