Home /News /career /

'आधार'च्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी Vacancy, या तारखेपर्यंत करा अर्ज

'आधार'च्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी Vacancy, या तारखेपर्यंत करा अर्ज

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) विविध पदांवरवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी (UIDAI Recruitment 2022) UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

  मुंबई, 27 मे : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) विविध पदांवरवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी (UIDAI Recruitment 2022) UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करायचा आहे. ते UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 13 जुलै आणि 9 जुलै 2022 आहे. दोन पदांसाठी (UIDAI JOBS 2022) जागा खालीलप्रमाणे आहे. पहिले पद UIDAI ने नवी दिल्ली येथील आपल्या मुख्यालयासह विविध राज्य कार्यालयांमध्ये खालील पदे (UIDAI Vacancy 2022) प्रतिनियुक्ति तत्वावर (बाह्य सेवा अट) भरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पदांनुसार अर्ज करावे : पदांची नावे - उप निर्देशक (प्रोद्यौगिकी) - सहायक निर्देशक (प्रोद्यौगिकी) - तंत्रज्ञान अधिकारी - सहायक तंत्रज्ञान अधिकारी - उप निदेशक - अनुभाग अधिकारी हेही वाचा... मोबाईल, कॉम्प्युटरसमोर झुकत आपण नकळत 27 किलो वजन पाठीच्या कण्यावर टाकतो - सहायक अनुभाग अधिकारी - सहायक लेखा अधिकारी - लेखाकार - खासगी सचिव - कनिष्ठ अनुवाद अधिकारी
  Koo App
  #Recruitment #UIDAI विभिन्न पदों के लिए #applications को अपने #Headquarters और राज्य कार्यालयों में प्रतिनियुक्ति के आधार पर (विदेश सेवा शर्तों) पर आमंत्रित करता है। अधिक जानकारी के लिये कृपया यहां देखें: https://uidai.gov.in आवेदन करने की अंतिम तिथि 13.06.2022 है - @UIDAI (@UIDAI) 27 May 2022 दूसरे पद विभागीय कार्यालय गुवाहाटी येथे अनुभाग अधिकारी पदांवर भरतीसाठी 23 मार्च 2022 पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. या पदांसाठी विविध माध्यमांतून अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र ज्यांनी 23 मार्च 2022 च्या मुदतीत आपले अर्ज योग्य त्या माध्यमातून पाठवले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नवे अर्जदार खालील पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात. या जागा प्रतिनियुक्तीच्या आधारे भरल्या जाणार आहेत त्यामुळे बिगर-सरकारी अर्जदार यासाठी पात्र नसतील. हेही वाचा... Optical Illusion: या फोटोतला जो मार्ग निवडाल तो सांगेल तुमची पर्सनॅलिटी आणि भविष्य अर्ज करण्यासाठी पत्ता : निर्देशक, (मा.स.), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआईडीएआई), हाउस्फेद परिसर, बेल्टोला, दिसपुर, गुवाहाटी- 781006
  अर्ज करण्याची शेवटची तारीख सर्व माध्यमातून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. या जागा प्रतिनियुक्तीच्या आधारे भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बिगर-सरकारी अर्जदार यासाठी पात्र नसतील. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया यूआयडीएआयची वेबसाइट www.uidai.gov.in भेट द्यावी.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Aadhar card, Job, Job alert

  पुढील बातम्या