मुंबई, 13 नोव्हेंबर : आर्थिक मंदीच्या काळात खासगी क्षेत्रातील नोकरी कधी जाईल, याचा भरवसा नसतो. म्हणूनच बहुतेक तरूण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. मात्र शिक्षण कमी असल्याने बऱ्याचदा सरकारी नोकरी मिळवणं शक्य होत नाही. मात्र अशा इच्छुकांसाठी एक संधी निर्माण झाली आहे.
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (10 अधिक 2) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :-
१) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
२) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक
३) डाटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता :-
मान्यताप्राप्त मंडळामधून 10 अधिक 2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण झालेला उमेदवार
वयोमर्यादा :-
वरील पदांवर काम करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल आणि त्यासाठी तुम्ही अर्ज दाखल करणार असाल तर कमाल 27 वर्षे ही वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
आवेदनाची अंतिम तारीख :-
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2020 ही असणार आहे.