Home /News /career /

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

मनीष सिसोदिया यांनी या पोर्टलचे(portal) अनावरण केले असून यावेळी बोलताना, कथा लहान मुलांना त्यांच्या विकासात आणि अभ्यासात देखील मदत करत असल्याचे म्हटले.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : कोरोनाच्या(covid 19) संकटाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून काही महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरु आहेत. त्याचबरोबर परीक्षा देखील ऑनलाईन होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा थेट शिक्षकांशी संबंध येत नसल्याने विद्यार्थी(student) जे काही आत्मसात करत आहेत याच्या दर्जावर प्रशचिन्ह आहेत. मुलांच्या शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांनी नवीन पोर्टलची घोषणा केली. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा होणार असून यामध्ये कमीतकमी 30 कोटी विद्यार्थी कथा(story) वाचू शकणार आहेत. मंगळवारी मनीष सिसोदिया यांनी या पोर्टलचे(portal) अनावरण केले असून यावेळी बोलताना, कथा लहान मुलांना त्यांच्या विकासात आणि अभ्यासात देखील मदत करत असल्याचे म्हटले. त्याचबरोबर आपण मुलांना लहान वयातच कथा वाचण्याची सवय लावणे गरजेचे असल्याचे म्हटले. या कथांमुळे मुलांच्या मेंदूचा विकास होत असून आम्ही दिल्लीमधील सरकारी शाळांमधे चुनौती’ आणि मिशन बुनियाद या योजनांतर्गत कथांचा वापर केला. यामुळे विद्यार्थ्यांची रुची वाढून त्यांचा बौद्धिक विकास होण्यात मदत झाली. यामध्ये आम्हाला कथा इंस्टीट्यूटने मोठी मदत केल्याचे देखील यावेळी म्हटले.सध्या दिल्लीमध्ये कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परंतु हे संकट कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्यात येणार आहेत. हे वाचा-JEE Main 2021: परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या शेड्युल कोरोनाच्या या संकटात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय नाही. देशभरातील काही भागांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सिसोदिया यांनी यावेळी म्हटले. 30 ऑकटोबरला केलेल्या घोषणेनुसार पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाची लस बाजारात येईपर्यंत शाळा उघडण्याची शक्यता दिल्लीमध्ये दिसत नाही. त्यामुळे आगामी काही महिने दिल्लीतील शाळा बंदच राहणार आहेत. मुलांच्या पालकांकडून देखील यासंदर्भात विविध प्रतिक्रिया येत असून यामुळे सरकारने शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे देखील सिसोदिया यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, हे नवीन पोर्टल केवळ भारतातील विद्यार्थ्यांना उपयुक्त नसून जगभरातील सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले. त्यामुळे कोरोनाच्या या संकटकाळात अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या