मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: गरीब कुटुंबातल्या युवकाचं उत्तुंग यश; IAS विशाल कुमार यांचा प्रवास देतोय प्रेरणा

Success Story: गरीब कुटुंबातल्या युवकाचं उत्तुंग यश; IAS विशाल कुमार यांचा प्रवास देतोय प्रेरणा

IAS Vishal Kumar

IAS Vishal Kumar

एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला युवक देशातल्या सर्वांत कठीण परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि एक रात्रीत चर्चेत येतो, हे खूपच आश्चर्यकारक आहे.

    मुंबई,  22 सप्टेंबर:  यूपीएससी (UPSC) किंवा एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत (Government Service) रुजू होऊन देशसेवा करावी, असं अनेक युवकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक तरुण-तरुणी कठोर परिश्रम करतात, दिवसरात्र एक करून अभ्यास करतात. काही तरुण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील अडचणींवर मात करून या परीक्षांमध्ये यशस्वी होतात. हे तरुण समाजासाठी, अन्य तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. आयएएस विशाल कुमार (IAS Vishal Kumar) हा तरुण त्यापैकीच एक होय. विशाल कुमार यांची कहाणी सामान्य तरुणांसाठी, तसंच सर्वच समाजासाठी प्रेरणा देणारी आहे. एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला युवक देशातल्या सर्वांत कठीण परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि एक रात्रीत चर्चेत येतो, हे खूपच आश्चर्यकारक आहे. `इंडिया डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दर वर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा (Civil Service Exam) देतात. त्यापैकी फार थोडे तरुण या परीक्षेत यशस्वी होतात; मात्र त्यापैकी काही युवकांचा हे यश मिळवण्यासाठीचा संघर्ष प्रेरणादायी असतो. आयएएस विशाल कुमार यांची कहाणी अशीच आहे. बिहारमधल्या (Bihar) मुझफ्फरपूर जिल्ह्यातले रहिवासी असलेले विशाल कुमार 2021 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 484 वी रॅंक मिळवून यशस्वी झाले. अतिशय गरीब कुटुंबातला हा तरुण या यशामुळे अचानक चर्चेत आला. 8वी पास उमेदवारांसाठी 63,000 रुपये पगारासह इंडिया पोस्टमध्ये बंपर ओपनिंग्स
    बिहारमधल्या मकसूदपुर गावात राहणारा विशाल यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं समजल्यावर गावात आनंदाचं वातावरण होतं. विशालचं अभिनंदन करण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली होती. विशालचं हे यश अन्य तरुणांसाठी एक उदाहरण ठरलं आहे.
    विशालनं आपल्या यशाचं पूर्ण श्रेय कुटुंबाला आणि त्याचे शिक्षक गौरीशंकर प्रसाद यांना दिलं आहे. `कठीण परिस्थितीत मला माझे शिक्षक गौरीशंकर प्रसाद यांनी खूप मदत केली,` असं विशाल आवर्जून सांगतो. शिक्षणासाठी त्यांनी विशालची फी भरली. पैशाची अडचण असताना त्यांनी विशालला आपल्या घरात आसरा दिला. जेव्हा विशाल नोकरी करू लागला तेव्हा त्यांनी त्याला नोकरी सोडून यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. तसंच त्यासाठी त्याला प्रोत्साहनदेखील दिलं. गौरीशंकर प्रसाद यांनी विशालला आर्थिक मदतही केली. यूपीएससी परीक्षेत आपला ठसा उमटवणारा विशाल अत्यंत गरीब कुटुंबातला आहे. त्याच्या वडिलांचं 2008 मध्ये निधन झालं. त्याचे वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर विशालच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे विशालची आई रीना देवी यांनी शेळी आणि म्हैसपालन (Goat And Buffalo Rearing) करून कुटुंबाचं संगोपन केलं. विशालचे वडील बिकाऊ प्रसाद नेहमी म्हणत, की 'माझा मुलगा शिक्षण घेऊन मोठा माणूस होईल.' वडील वारले; पण विशालने वडिलांचं स्वप्न साकार केलं. 10वी पास असो वा ग्रॅज्युएट महिन्याचा 83,000 रुपये पगार; मुंबईत 1041 Vacancy
    विशाल 2011 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत अव्वल ठरला. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. आयआयटी कानपूरमधून उत्तीर्ण झाल्यानंतर विशालला रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी मिळाली. `विशाल लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. वडिलांच्या निधनानंतर त्याने नोकरी करण्यास सुरुवात केली आणि अथक प्रयत्नांतून त्याने हे यश मिळवलं,` असं त्याचे शिक्षक गौरीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Career opportunities, Ias officer, Success stories

    पुढील बातम्या