मराठी बातम्या /बातम्या /करिअर /RBI Summer Internship: उमेदवारांनो, रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी लगेच करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण Process

RBI Summer Internship: उमेदवारांनो, रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी लगेच करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण Process

यासाठी उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट, chance.rbi.org.in द्वारे अर्ज करू शकतात.

यासाठी उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट, chance.rbi.org.in द्वारे अर्ज करू शकतात.

यासाठी उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट, chance.rbi.org.in द्वारे अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली, 02 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI Summer Internship 2022) इंटर्नशिप करण्याची ही सुवर्णसंधी आहे. RBI नं वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम (RBI Summer Internship 2022) जाहीर केला आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण/ तरुणी रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपसाठी (Top Internship programs in India) अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे यामध्ये देशासह परदेशात राहणारे विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या इंटर्नशिपसाठी (How to register for RBI Internship)अर्ज कसे करायचे आणि त्यासाठी पात्रता (Eligibility for RBI Internship) काय असेल? याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of RBI summer internship) 31 डिसेंबर 2021 आहे. यासाठी उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट, chance.rbi.org.in द्वारे अर्ज करू शकतात.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वार्षिक उन्हाळी इंटर्नशिपसाठी एकूण 125 उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिले जाईल. ही इंटर्नशिप एप्रिल 2022 मध्ये सुरू होईल. परदेशी विद्यार्थीही यासाठी अर्ज करू शकतात.

खूशखबर! TCS नं फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी आणला Free Certification Program   

ही असेल इंटर्नशिपसाठीची पात्रता (Eligibility for RBI Summer Internship)

मॅनेजमेंट, फायनान्स, सांख्यिकी, कायदा, अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. व्यावसायिक पदवीचे तीन वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मॅनेजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ मध्ये शिकत असलेले परदेशी विद्यार्थीही यासाठी अप्लाय करू शकतात.

अशी होणार उमेदवारांची निवड (Selection process for RBI Summer Internship)

या RBI Summer Internship साठी उमेदवारांना प्रथम शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली जाईल आणि मार्च 2022 मध्ये निकाल जाहीर केला जाईल. अशा प्रकारे काही टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीनं करा अर्ज (How to apply for RBI Summer Internship)

सर्व उमेदवार सर्वप्रथम opportunities.rbi.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट देतात.

मुख्यपृष्ठावर दिलेल्या समर प्लेसमेंट विभागावर क्लिक करा.

आता online web-based application form अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

विनंती केलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे येथे अपलोड करा.

सबमिट वर क्लिक करा आणि शेवटी प्रिंट काढा.

IT क्षेत्रात करिअर करायचंय? मग 'या' टॉप Programming Languages शिकणं महत्वाचं

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBI Summer Internship साठी अप्लाय करण्यासाठी https://opportunities.rbi.org.in/scripts/ApplicationForm या लिंकवर क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Rbi, जॉब