मिथुन आणि मेष राशीच्या लोकांची आज होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या काय आहे आजचं राशीभविष्य

मिथुन आणि मेष राशीच्या लोकांची आज होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या काय आहे आजचं राशीभविष्य

कसा असेल 12 फेब्रुवारीचा दिवस, कोणत्या राशींना मिळणार शुभ वार्ता आणि कोणत्या राशींसाठी आहे सावधानतेचा इशारा वाचा सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीकधी काही दिवस आपल्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येतो तर कधीकधी आपल्यासमोर अशी अनेक आव्हाने असतात. हे आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीमुळे होत असतं. आपला दिवस कसा असेल, जर हे माहित असेल तर आपण सावधगिरी बाळगून आपल्य़ाला येणाऱ्या समस्यांचं निराकरण करू शकतो. जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा दिवस आपल्यासाठी कसा असेल

मेष - कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागेल. वेळ वाया घालवू नका. जोडीदारासोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. कोणासोबतही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

वृषभ - आपल्या कार्य आणि विचारानं इतरांना प्रभावित कराल. प्रेमात पडाल. अडचणींचा सामना करावा लागेल. कौटुंबिक जीवनात मुलांसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल.

मिथुन - मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. मोठ्या योजना आखल्या जाऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. आजचा दिवस थोडा त्रासदायी असणार आहे.

कर्क - स्वत:साठी पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. नव्या संधी मिळतील. कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा. काम पूर्ण होण्यास थोडा उशीर होईल.

सिंह - मानसिक ताण जाणवेल. मिळालेला वेळ सत्कारणी लावण्यावर भर द्या. पारंपरिक पद्धतीनं गुंतवलेल्या पैशांमधून दीर्घकालीन नफा मिळेल. पार्टनरसोबत वेळ घालवा. आजचा आपला दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे.

कन्या - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आर्थिक चणचण जाणवेल. आपण आखलेल्या योजनांमध्ये अडथळा येऊ शकतो. दृढ इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. येणाऱ्या संकटांना धीराने तोंड द्या. कुटुंबियांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल.

तुळ - ताण घालवण्यासाठी आपल्या मुलांसोबत वेळ घालवा. आर्थिक फायदा होईल. आजच्या दिवसात मनसिक स्थिती तणावाची राहिल.

वृश्चिक - प्रवास होतील. मनोरंजनात जास्त वेळ घालवू नका. पार्टनरसोबत आज वाद होतील. आजचा आपला दिवस फार व्यस्त असेल.

धनु - आरोग्य चांगले राहिल. आजचा दिवस आनंद देणारा असेल. आज आर्थिक लाभ होईल. नातेवाईक आणि प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. जुन्या आठवणींचा उल्लेख करणं टाळा अन्यथा वाद होतील.

मकर - आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे त्यामुळे आरोग्य सुधारण्यावर लक्ष द्या. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. बोलताना शब्द जपून वापरा.

कुंभ - आरोग्याची काळजी घ्या. श्वसनाच्या समस्यांना सामोरं जावं लागेल. संकटांचा सामना करताना ज्येष्ठांची मदत घ्याल. घेतलेल्या निर्णयावर पुर्नविचार करा. तुमच्या योजनांमध्ये बदल होऊ शकतात.

मीन - नकारात्मक वृत्ती टाळा, शारीरिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक फायदा होईल. अतिरेक करणं टाळा. योजना आखण्याआधी नीट विचार करा.

First published: February 12, 2020, 7:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading