• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होतेय भरती

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होतेय भरती

Railway

Railway

माध्यमिक शिक्षण आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 जून : रेल्वे विभागात (Railway Department) नोकरी करण्याचं अनेक सुशिक्षित युवकांचे स्वप्न असतं. अशा युवकांसाठी ही बातमी नक्कीच महत्वाची आहे. कारण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी या युवकांना मिळू शकते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधांमुळे नोकऱ्या आणि उद्योग अडचणीत आले आहे. त्यामुळे अनेकांना आपला रोजगार किंवा नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यातच नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांची स्थिती अधिक बिकट आहे. अनेक युवक शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे ही रेल्वेतील पदभरती युवकांसाठी उत्तम संधी म्हणता येईल. रेल्वेत ट्रॅक मेन्टेनर (Track Maintainer) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, यासाठीची नियुक्ती वेगवेगळ्या ठिकाणी असेल. एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेने ट्रॅक मेन्टेनर च्या हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. रेल्वे भरती मंडळाकडून (Railway Recruitment Board) लवकरच ग्रुप डी मधील या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. जर तुम्ही माध्यमिक शिक्षण आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्ही या पद भरतीसाठी अर्ज करु शकता. ही शैक्षणिक पात्रता आवश्यक माध्यमिक शिक्षण आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. संबंधित ट्रेड साठी आयटीआय (ITI) उमेदवारच पात्र ठरणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी इच्छूक उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबतची पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. GD Constable पदांसाठी मेगाभरती; बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करुन भरता येईल अर्ज वयोमर्यादा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल वय 33 असावे. वयोमर्यादेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार नोटिफिकेशन (Notification) पाहू शकतात. नोटिफिकेशनमध्ये याची सविस्तर माहिती मिळेल. किती पदांसाठी होणार भरती  रेल्वे भरती मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी सर्व पदे मिळून ट्रॅक मेन्टेनर ग्रेड IV ची एकूण 40712 पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबवली जाईल. ही सर्व पदे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये (Engineering Department) भरली जातील. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. असा करा अर्ज  रेल्वेतील या पदांच्या भरती संदर्भात माहितीसाठी उमेदवार रेल्वे भरती मंडळाच्या http://www.rrbcdg.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. याशिवाय उमेदवार रेल्वेच्या वेगवेगळ्या आरआरबी वेबसाईटवरुनही या भरती प्रक्रियेबाबत माहिती घेऊ शकतात. भरतीचे नोटिफिकेशन किंवा पद भरतीचा अर्ज हा नेहमी अधिकृत वेबसाईटवरुनच भरावा, हे इच्छूक उमेदवारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  First published: