• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Railway Jobs: परीक्षा न देता मिळवा नोकरी; रेल्वेकडून हजारो जागांसाठी भरती

Railway Jobs: परीक्षा न देता मिळवा नोकरी; रेल्वेकडून हजारो जागांसाठी भरती

अर्जप्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवाराला सर्वप्रथम wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : देशभरात गेल्या दीड ते दोन वर्षांत कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. याला उद्योग क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनाच्या स्थितीमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. ही स्थिती एकीकडे असताना शिक्षण पूर्ण झालेले युवक रोजगार किंवा नोकऱ्यांच्या शोधात आहेत. सरकारी नोकरी (Government Jobs) हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण कठोर परिश्रम करतात. सध्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पश्चिम-मध्य रेल्वेचा पदभरती विभाग अॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी म्हणता येईल. याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे. पश्चिम-मध्य रेल्वेच्या भरती सेलनं अॅप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवार कोणतीही परीक्षा न देता ही नोकरी मिळवू शकतो. या प्रक्रियेतून अॅप्रेंटिसच्या 2226 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नोंदणी प्रक्रिया (Registration Process) 11 ऑक्टोबरपासून सुरू होत असून, अर्ज करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत असेल. याशिवाय, रेल्वे भरती सेलकडून (Railway Recruitment cell) पूर्व विभागातल्या अॅप्रेंटिस पदांवर मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून 3366 पदं भरली जाणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी आजपासून (8 ऑक्टोबर) अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना आरसीसीच्या www. rrcer.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन (Online) अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. फी जमा करण्याची अंतिम मुदत हीच असेल. यासाठीची गुणवत्ता यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी घोषित करण्यात येईल. हे ही वाचा-Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी पश्चिम-मध्य रेल्वे विभागातल्या अॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवारांनी wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी. या पदांकरिता इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असावं. तसंच इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा किंवा त्यानं समकक्ष परीक्षेत उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र मिळवलेलं असावं. याशिवाय त्याच्याकडे एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटीकडून (SCVT) मिळालेलं राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्रही असावं. नोटिफिकेशनमधल्या माहितीनुसार, उमेदवाराचे हायस्कूल आणि आयटीआयचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या यादीतल्ा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी (Document Verification) बोलवण्यात येईल. जे उमेदवार ही प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांचीच निवड केली जाणार आहे. या पदांकरिता अर्ज करण्यासाठी अशी आहे प्रक्रिया अर्जप्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवाराला सर्वप्रथम wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर वेबसाइटवरच्या अर्जावर क्लिक करावं लागेल. त्यात मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर कागदपत्रं सबमिट करावी लागतील. फोटो आणि सही अपलोड करावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढावी लागेल. या प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि महिला हे वगळता अन्य सर्व उमेदवारांकरिता 100 रुपये अर्ज शुल्क असेल. हे शुल्क देण्यासाठी उमेदवार, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, ई-वॉलेटचा वापर करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक संधी असून, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
  First published: