Home /News /career /

10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी, परीक्षा न देता होणार भरती

10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी, परीक्षा न देता होणार भरती

मेरिट लिस्टवर होणार सिलेक्शन, 22 जानेवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत

    मुंबई, 02 जानेवारी: Railway Recruitment 2020: तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे भर्ती बोर्डाकडून अपरेंटिस पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी 22 जानेवारीपर्यंत उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेकडून या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता भर्ती करणार आहे. तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर या पदांसाठी अर्ज करू शकता. उमेदवाराला अर्ज करण्याबाबतचे काही तपशिल पुढील प्रमाणे Railway Recruitment 2020: अपरेंटिस पदांसाठी 2,562 उमेदवारांची भर्ती Railway Recruitment 2020: उमेदवारी अर्ज ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन भरायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी 2020 पर्यंत देण्यात आली आहे. Railway Recruitment 2020: शैक्षणिक पात्रता हेही वाचा-नव्या वर्षात खाजगी क्षेत्रात मिळणार 7 लाख नोकऱ्या, 8 टक्क्यांनी वाढणार पगार अपरेंटिस पदांसाठी अर्ज करण्या करिता उमेदवार 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणं आवश्यक आहे. याशिवाय संबंधित विषयात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र मिळवलेलं असणं आवश्यक आहे. असे उमेदवार त्वरित अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. उमेदवाराच्या वयाची पात्रता- 15 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. Railway Recruitment 2020: निवड प्रक्रिया रेल्वे अपरेंटिस पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार नाहीत. मात्र मेरिटच्या आधारांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. Railway Recruitment 2020: इच्छुक उमेदवारांनी सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन करियर किंवा अनाऊंसमेटमध्ये नोकरीबाबत माहिती दिली असेल त्यावर क्लिक करावं. तिथे आपले डिटेल्स रजिस्टर करा. त्यानंतर फॉर्म भरू शकता. लक्षात असूद्या फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी आहे. यामध्ये ओबीसी एस, एन साठी विशेष आरक्षित कोटा देण्यात आला आहे. हेही वाचा-गुगलमध्ये सर्च करू नका GOOGLE देतंय नोकरी, जाणून घ्या कसा करायचा अर्ज
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Indian railway, Railway jobs

    पुढील बातम्या